India Languages, asked by ankitguru6224, 11 months ago

Marathi quotes for essay on Diwali

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

सर्व प्रथम, हे समजून घ्या की भारत हा सणांची भूमी आहे. तथापि, कोणताही सण दिवाळीच्या जवळ येत नाही. हा नक्कीच भारतातील सर्वात मोठा उत्सव आहे. हा कदाचित जगातील सर्वात उजळ उत्सव आहे. वेगवेगळ्या धर्मांचे लोक दिवाळी साजरे करतात. सर्वात उल्लेखनीय म्हणजे, हा सण अंधारावरच्या प्रकाशाचा विजय दर्शवितो. याचा अर्थ असा आहे की वाईट आणि ज्ञानाबद्दल चांगले असणे हे अज्ञानापेक्षा अधिक चांगले आहे. हे दिवे उत्सव म्हणून ओळखले जाते. यामुळे दिवाळीच्या काळात संपूर्ण देशात चमकणारे दिवे असतात. दिवाळीवरील या निबंधात आपल्याला दिवाळीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिसेल.

Answered by halamadrid
3

■■"दिवाळी" वर निबंध■■

दिवाळी हा माझा सगळ्यात आवडता सण आहे. दिवाळी हा सण भारतामधील एक लोकप्रिय सण आहे.

दिवाळी हा सण दिव्यांचा आहे.दिव्यांच्या उजेडाने अंधाराला दूर करण्याचा सण म्हणजेच दिवाळी. दिवाळीत लोक आपआपल्या घरासमोर दिवे पेटवतात,कंदील लावतात,रांगोळ्या काढतात,फुलांनी घराची सजावट करतात.

दिवाळीच्या अगोदर लोकांची नवीन वस्तू,कपड्यांची खरेदी करण्याची सुरुवात होते,घराची साफसफाई करणे, फराळ व इतर गोड पदार्थ आणि मिठाई बनवायची सुरुवात होते.

धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,बळीप्रतिपदा, भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवस आहेत. प्रत्येक दिवसाचे आपले वेगळे महत्व असते.

लोकांना दिवाळीत ऑफिस,शाळा,कॉलेजला सुट्टी असते. लोक फटाके फोडून,एकमेकांच्या घरी जाऊन,त्यांना भेटून, एकमेकांना भेटवस्तू,शुभेच्छा,फराळ,मिठाई देऊन आनंदात हा सण साजरा करतात.

हा सण उत्साहाचा व आनंदाचा असून, दिवाळीत सर्वत्र आनंदमय वातावरण असते.

Similar questions