Hindi, asked by vish4380, 11 months ago

Marathi report writing on independence day​

Answers

Answered by anujnandal09
2

Answer:

१५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन. ब्रिटिश राजवटीच्या १५० वर्षांच्या जोखडातून मुक्ती मिळल्याचा दिवस. अवघा देश स्वातंत्र्याचा जल्लोष करीत होता. मात्र मराठवाडा गुलामीतच होता. कारण आपल्या प्रदेशावर हैदराबादच्या निझाम संस्थानाची सत्ता होती व याचा राजा होता ‘निझाम मीर उस्मानअली खान बहादूर नियामुद्यौला निजाम-उल-मुल्क आसफजाह’. त्याकाळी भारतात जेवढी संस्थाने होती त्यात सर्वात मोठे संस्थान हे निझामाचे होते. देश स्वतंत्र होताच ही संस्थाने भारतात सामील झाली पण निझामाने मात्र सामील होण्यास नकार दिला.

हैदराबाद संस्थानात तेलंगणा, कर्नाटक व मराठवाडा असा प्रदेश निझामाच्या अधिपत्त्याखाली होता व संस्थानाची लोकसंख्या होती १ कोटी ६० लाख. अत्यंत समृद्ध असा प्रदेश असल्यामुळे निझामाला सत्ता सोडवत नव्हती. शेवटी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसंग्राम सुरू झाला. जनतेचा हा लढा मोडून काढण्यासाठी निझामाचा सेनापती कासीम रिझवी याने जनतेचा अनन्वीत छळ करण्यास सुरुवात केली. या आंदोलनात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बरोबर दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांनी पुढाकार घेतला व लढा आणखी तीव्र केला. जनतेचा सहभाग वाढू लागला. खेड्यापाड्यांत हा लढा पसरला.

Explanation:

Similar questions