Marathi week in my school essay in Marathi
Answers
Answer:
प्रस्तावना:
प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठे योगदान असते ती म्हणजे – शाळा. मानवाकडे जन्मापासून विशेष कला असते. परंतु या पृथ्वीवर आल्यानंतरच त्याला कोणत्याही प्रकारचे विशेष ज्ञान मिळते.
आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडविण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. तो म्हणजे – एक आई, दुसरं म्हणजे आपला परिसर आणि तिसरं म्हणजे आपली शाळा.
आपण सर्वजण जास्तीत -जास्त वेळ हा शाळेतच घालवतो. आपल्या शाळेवर आपले आई – वडील एक मोठी जबाबदारी टाकतात. शाळा ही एक व्यक्ती आणि एक राष्ट्र घडविण्यात खूप मोठी भूमिका बजावते.
माझी शाळा
माझ्या शाळेचे नाव शारदा विद्यालय असे आहे. माझी शाळा खूप छान आहे आणि हि तीन मजली इमारत आहे. माझी शाळा शहराच्या मध्यभागी स्थित आहे.
माझी शाळा माझ्या घरापासून ३ किमी अंतरावर आहे. मी नेहमी बसमधून शाळेत जातो. माझ्या शहरात जेवढ्या शाळा आहेत.
त्या सर्व शाळांपैकी माझी शाळा सर्वोत्तम आहे. माझ्या शाळेच्या आजूबाजूला प्रदूषण, आवाज आणि धूळ न करता अतिशय शांत ठिकाणी स्थित आहे.
माझ्या शाळेमध्ये १ ली ७ वी पर्यंत वर्ग आहेत. तसेच एक वाचनालय आणि खेळण्यासाठी मोठे मैदान आहे.
ग्रंथालय (वाचनालय)
माझ्या शाळेत एक खूप मोठे ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात अन्य प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. शाळेतील सर्व मुले तिथे जाऊन वाचण्यासाठी पुस्तके घेतात. तसेच त्या ग्रंथालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य सुद्धा आहे.
सुंदर बाग
माझ्या शाळेच्या समोर एक सुंदर बाग आहे आणि तिथे एक छोटेसे तलाव सुद्धा आहे. त्यामध्ये बरेच मासे आणि बेडूक सुद्धा राहतात. त्या बागेमध्ये रंगीबिरंगी फुले, शोभेची झाडे, हिरवेगार गवत सुद्धा आहे.
ज्यावेळी या बागेमध्ये रंगीबिरंगी फुलांच्या झाडावर फुले उमलतात तेव्हा हि बाग अत्यंत सुंदर दिसते. या सुंदर बागेमुळे माझ्या शाळेची सुंदरता अजून वाढते.
खेळाचे मैदान
माझ्या शाळेच्या समोर एक खूप मोठे मैदान आहे. आमचे वर्गशिक्षक आम्हा सर्व मुलांना प्रत्येक दिवशी शाळा सुटायच्या आधी अर्धा तास खेळायला सोडतात. तसेच अन्य वर्गातील मुले सुद्धा अन्य प्रकारचे खेळ खेळतात. जसे कि कबड्डी, खो – खो, क्रिकेट, टेनिस.
शाळेच्या दिवसाची सुरुवात
Essay On My School in Hindi
माझी शाळा ही एक मंदिरासारखी आहे.आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात ही प्रार्थनेपासून होते. आम्ही सर्व वर्गातील मुले एक रांगेने हॉल मध्ये जमतो.
सरस्वती मातेला वंदन करून त्यानंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हटला जातो. मुख्य प्रतिनिधी हा महत्वाच्या बातम्या सांगतो. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व धर्मातील महत्त्व सांगतात.
विविध कार्यक्रम
Essay On My School in Hindiमाझ्या शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच आंतर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध खेळांचे आयोजन केले जाते. कोणत्याही प्रोग्राममध्ये माझी शाळेचा प्रथम क्रमांक येतो.
माझी शाळेमध्ये शिक्षक दिन, पालक दिन, बालक दिन, शाळा वर्धापन दिन, गांधी जयंती, लोकमान्य टिळक जयंतीगणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिवस इत्यादि सर्व साजरे केले जातात.
निष्कर्ष:
माझी शाळा ही खूप सुंदर शाळा आहे आणि मला माझ्या शाळेचा अभिमान आहे. रोजच्या अभ्यासाबरोबर आमच्या कला गुणांचा गौरव करणाऱ्या आणि देशप्रीतिचे धडे देणाऱ्या माझ्या शाळेवर मला गर्व आहे. मला खूप शिकून माझ्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे आहे.
मराठीतील माझी शाळा निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता
MARK AS BRAINLIST.