matdan prakriya online zali tar essay in marathi
Answers
Answer:
hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
मतदान प्रक्रिया ऑनलाईन झाली तर ..... मराठी निबंध
मतदान हे लोकशाही अंगिकारलेल्या देशासाठी अतिशय महत्वाचं कार्य आहे. जनता आपला मतदानाचा अधिकार वापरून सरकार बनवू शकते.
मतदानाची तारीख जाहीर झाली की त्या अनुषंगाने सगळ्या कार्यक्रमाची आखणी होते. शाळेला सुट्टी जाहीर होते कार्यालयं अर्धवेळ होतात, शिक्षक किंवा अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होतात. सकाळपासून मतदान केंद्रापुढे रांगा लागतात.
पण मतदान प्रक्रिया ही ऑनलाईन झाली तर हे सगळं चित्र बदलून जाईल. लोकं घरबसल्या मतदान करू शकतील. कमी मनुष्यबळ वापरून ही प्रक्रिया पार पाडता येईल. मतदानासाठी कागद वापरावा लागणार नाही. आपोआपच त्याचीही बचत होईल. नागरिकांना ते जगात कुठेही असले तरी मतदान करून आपलं सरकार निवडता येईल. यासाठी ऑनलाईन प्रक्रियेची योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल. त्यात होणारे गैरव्यवहार रोखावे लागतील.
या प्रक्रियेत जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. सगळ्या मतदात्यांना संगणक साक्षर करावं लागेल. त्यांना ऑनलाईन मतदानाची प्रक्रिया समजावून सांगावी लागेल. जे नवखे आहेत त्यांची यात फसगत होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कडून बळजबरीने मतदान करून घेतलं जाण्याची शक्यता निर्माण होईल.
असे गैरव्यवहार होण्याचे बरेच मार्ग असतील. त्यांना आळा घालावा लागेल. इंटरनेट आणि तंत्रज्ञान यांची योग्य ती सांगड घालावी लागेल.