Give essay in Marathi
Answers
Explanation:
'दगड'
'दगड' म्हणजे 'देव' असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहीलं तर दिसतो.
अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.
हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो.
■■मराठीत निबंधाचे एक उदाहरण■■
◆◆'पोस्टमन' वर निबंध◆◆
पोस्टमन हा आपला मित्र आहे. आपण पत्र पाठवतो,आपल्याला पत्र येतात. ती सुख- दुःखाची असतात. कधी शुभेच्छांची असतात. कधी मदतीची असतात. आपली ही पत्रे पोस्टमन आणून देतो. म्हणून तो आपला मित्र आहे.
पोस्टमन कुठेही पटकन ओळखता येतो. तो नेहमी गणवेशात असतो. त्याच्या खांद्याला पिशवी असते. पिशवीत पत्रे असतात.
पोस्टमन घरोघर जातो. लोकांना पत्रे देतो. त्याला उन्हातून व पावसातून जावे लागते. जिने चढावे लागतात. पण, पोस्टमन न थकता काम करतो. म्हणून आपल्याला आपली पत्र मिळतात.
तो त्याच्या कामाचा कंटाळा करत नाही. तो रोज मेहनतीने व ईमानदारीने त्याचे काम करत असतो.पोस्टमन आळशी नसतो. तो नियमितपणे आपली पत्रे अचूक आणून देतो.
त्याच्यामुळे आपल्याला आपली पत्र वेळेवर मिळतात. तो आपल्या सर्वांचा दूतच आहे.