matsyalay essay in Marathi for STD 6th
Answers
Explanation:
Plz make me understand matsyalay
*मत्सालय essay in मराठी*
पृथ्वीवर विविध जाती, रंग, वर्ण धारण करणारे जीव आढळतात. जमिनीवर लहान मुंग्या, ते आकाशात उडणारे छोटे व मोठे प्राणी तसेच समुद्रातील मोठे व छोटे मासे हे त्यातलाच प्रकार आहेत. आणि या माशांना बघण्यासाठी आपण समुद्रात जाऊ शकत नाही, म्हणूनच अशा माशांना मत्सालय मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येते. अशीच काहीशी गोष्ट तारापोरवाला मत्सालय ची.
आमच्या शाळेतून एका शनिवारी आम्हाला तारापोरवाला मत्स्यालय दाखवण्यास न्हेण्यात आले. सकाळी सहा वाजता आमच्या शाळेतून दोन बस रवाना झाल्या. मत्सालय बघण्याची सगळ्यांचीच इच्छा होती, पण सगळ्या मुलांना न्हेयु न शकल्यामुळे काही मुलांना न्हेण्यात आले.
सकाळी सात वाजता आम्ही मत्सलया वर पोचलो. मसाल्याच्या प्रवेशद्वारावर दोन मोठे डॉल्फिन माशांची आकृती बनली आहे. प्रवेश शुल्क घेतल्यानंतर आम्ही आत मध्ये गेलो. मत्स्यालयात जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मी खूप खुश होतो. अवाढव्य रत्नागिरीमध्ये सापडलेला वेल माशाचा सांगाडा प्रवेश द्वारा वरच ठेवण्यात आला होता. त्या वेल माशाचा आकार बघून माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हळू हळू आम्ही आत मध्ये गेलो आणि बघायला मिळाले ते मोठ-मोठाले फिश टॅंक. काचेच्या या डब्यात एक वेगळीच दुनिया जणू वसली होती. डाव्या बाजूला गोड्या पाण्यातील मासे होते, तर उजव्या बाजूच्या समुद्रातील खाऱ्या पाण्याचे मासे. पांघोडे मी पहिल्यांदा बघितले तिकडे. एका मोठ्या थँक मध्ये कासव पोहत होते, एकमेंच्या अंगावर खेळत होते, हे बघून माझे मन हर्षित झाले. पुढे एक मोठे कासव एकटेच फिरत होते, त्याचा आकार एवढा मोठा होता की तो त्या काचेच्या डब्यात एकटाच होता. वागळे म्हणजेच स्टींग्रय सुद्धा बघण्यात आली, तसेच रंगीबेरंगी मासे, निमो (clownfish), माखले (ऑक्टोपस), जेलीफिष (jellyfish)
सुद्धा खूप मोठ्या संख्येत होते. शेवटी गोड्या पाण्यामध्ये गोल्डफिश, फायटर फिश, अँगेल फिश, गुरामी, शार्क, ब्लॅक मोली, बल्लून मोली हे सामान्य मासे पोहत होते. आमचा दिवस कसा भरभर गेला हे आम्हाला समजलाच नाही.
दुपारी अकरा वाजता आम्हाला नाश्ता देण्यात आला आणि आम्ही परत शाळेत परतलो.
ह्या आठवणी माझ्या मनात घट्ट जागा करून बसले आहेत.