India Languages, asked by maninderchahal2876, 10 months ago

sagarachi atmakatha essay in marathi

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

जगातील महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 70% व्यापते. या निबंधात मी "आपले समुद्री स्रोत काय आहेत आणि भविष्यात महासागराचे महत्त्व काय आहे" याबद्दल बोलू. प्रथम, आपला महासागरातील सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे अन्न. समुद्रामध्ये समुद्री वनस्पती आणि सागरी प्राणी यासारखे दोन प्रकारचे खाद्य आहेत.

Answered by Hansika4871
2

*Sagarachi Atmakatha*

रंग माझा निळा, म्हणतात मला सागर म्हणजेच समुद्र. अगदी बरोबर ओळखलत मला! मी समुद्र बोलतोय. माझ्या शरीरात खारे पाणी भरलेले असते. चंद्राच्या सहायाने, म्हणजेच त्याच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या शक्तीमुळे माझ्या लातेंची उंची देखील बदलते. मला भरती त्या चंद्रमुळेच येते. यंदा पाऊस खूप चांगला पडला होता त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे लोकांना माझे रौद्र रूप पाहण्यात मिळाले.

अतिवृष्टीमुळे माझ्या पाण्याची पातळी खूप वाढली होती. केरळ सारख्या भागात त्यामुळे पुर आला, माझा नाईलाज होता. खूप लोकांची घरे उध्वस्त झाली, खूप प्राणी, पक्षी, माणसे बेघर झाली. ह्याचे मला खूप वाईट वाटले, मी खूप रडलो. पण असो दुःखद गोष्टी बाजूला ठेवल्या तर बऱ्याच चांगल्या गोष्टी देखील झाल्या. अख्या वर्षाचा पाणी पुरवठा झाला जेणे करून खाऱ्या पाण्याला काही लोक गोड्या पाण्यात बनवू शकतात. माश्यांची संख्या वाढली. इको सिस्टम वाढू लागले.

चांगल्या गोष्टी बघताना आपण वाईट गोष्टींना दुर्लक्ष करून चालणार नाही. पाण्याचे प्रदूषण हल्ली खूप अती प्रमाणात होत आहे ह्या साठी माणूस कुठे ना कुठे जबाबदार आहे. प्लास्टिक मुले समुद्रातील माश्यांचे निधन होत आहे. कारखान्यांमधील कचरा, घाण पाणी, हे सगळे माझ्या अंगात सोडले जाते. ह्या मुळेच मी दूषित होत चाललो आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर खूप वाईट रीतीने पडत आहे. आणि मी आजारी पडत आहे. समुद्रातील वनस्पतींचा रोज मी रडणार आवाज ऐकतो आणि खूप रडतो. ह्या निष्पाप जीवांचा काई दोष ?

समुद्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नवीन नवीन गोष्टी (जेणेकरून प्रदूषण कमी होईल, जीव जीवाणूंच्या आयुष्याची काळजी घेतली जाईल) अश्या गोष्टी बनवायला पाहिजे. असो आता माझी भरतीची वेळ झाली आहे, तुमच्याशी मी नंतर बोलतो.

Similar questions