English, asked by chanchalpawar, 10 months ago

maza aavadata san divali nibhand​

Answers

Answered by ganesha108
4

Answer:

सर्व सणांमध्ये दिवाळी हा माझा आवडता सण आहे दिवाळी हा सन अश्विन महिन्यात येतो . त्यावेळी शाळेला सुट्टी असते . दिवाळीच्या दिवसांत आमच्या घरी खूप धामधूम असते . आम्ही घर सजवायला दारावर तोरण बांधतो . मी आणी ताई घरीच कंदील करतो . लाडू , करंज्या , चिवडा , चकल्या असे वेगवेगळे पदार्थ आई बनवते . त्यावेळी तिला आम्ही मदत करतो . आईबाबा दिवाळीला आम्हांला नवीन कपडे घेतात . नवीन कपडे घालून आम्ही आनंदाने फिरतो . आम्ही खूप फटाके वाजवतो . मित्रांबरोबर खेळतो आणि भरपूर भटकतो . दिवाळीच्या दिवसांत आम्ही दारात रांगोळी काढतो संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करतो . भाऊबिजेला ताई मला ओवाळते . मी तिला भेटवस्तू देतो . दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे . तो आनंदाचा सण आहे . दिवाळी सगळीकडे उल्हास असतो . म्हणून दिवाळी हा सण मला खूपच आवडतो .

Similar questions