India Languages, asked by dritiparmar, 11 months ago

maza aavadta prani essay in marathi​

Answers

Answered by Hansika4871
8

माझा मोती बघा कसा

शेपटी हलवत आला.

प्रेमळ माझा कुत्रा,

पण चोरही घाबरे त्याला!

प्राण्यांविषयी नेहमी मला आत्मीयता, तळमळ, प्रेम आहे.प्राणी जरी मुके असले तरी त्यांना मनाची, स्पर्शाची भाषा समजते. ही आवड जोपासण्यासाठी मी घरी कुत्रा पाळला आहे. म्हणूनच माझा आवडता प्राणी कुत्रा आहे.

माझ्या कुत्र्याचे नाव मी मोती ठेवले आहे. शाळेतून घरी जाताना मला एका डब्यात मोती सापडला, त्याच्या पायाला जखम झाली होती. मी त्याला घरी घेऊन आलो आणि मलमपट्टी केली. आई बाबांना आधी हे मान्य नव्हते पण मोतीच्या नजराने दोघांनी त्याला घरी ठेवायला मान्यता दिली. मोती रोज माझ्यासोबत खेळतो, त्याला माणसांची भाषा समजते, तो माझे सगळे ऐकतो आणि म्हणूनच मला माझा मोती खूप आवडतो.

Answered by yashica123
3

Answer:

Explanation:

Here's your answer

Attachments:
Similar questions