India Languages, asked by SRISAI6244, 1 year ago

Maza avadta khel Marathi nibandh: (माझ्या आवडत्या खेळावरील निबंध)

Answers

Answered by AvaneeshVBiradarAVBI
6

कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू, या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे.[१] मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया इत्यादी देशात खेळला जातो. जपान याही देशात तो प्रसारित झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला.

==मैदाने== ग्राउंड

पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ मैदानावर माती मध्ये जास्त प्रमाणात खेळल्या जातो.

Answered by Mandar17
6

खेळ हे दोन प्रकारचे आतील खेळ व बाह्य खेळ . मला सर्व बाह्य खेळ खेळायला खूप आवडतात. पण खो-खो हा माझा आवडता खेळ आहे . हा खेळ संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा असा आहे . वेग या खेळाचे प्रमुख लक्षण आहे . खो खो या खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते .हा खेळ दोन संघ मध्ये खेळाला जातो. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात परंतु ९ खेळाडू खेळतात . हा खेळ दोन विव्हगमध्ये विभागलेला असतो. पहिल्या भागात पहिला संघ पाठलाग करतो तर दुसरा बचाव करतो  व  दुसऱ्या भागात दुसरा पाठलाग करतो तर पहिला बचाव करतो . संपुर्ण खेळ हा ३७ मिनिटांचा असतो.

Similar questions