English, asked by ks4h3ihariyaaishasre, 1 year ago

Maza avadta Rutu pavsala in marathi

Answers

Answered by tejasmba
2315

माझा आवडता ऋतु - पावसाळा

पावसाळा आला कि सर्व प्रथम आठवते ते हेच गीत.

येरे येरे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा
येग येग सरी माझे मडके भरी
सर आली धाऊन मडके गेले वाहून 

पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. जुन महिना सुरू झाला आणि पावसाळा आला असे समजावे. बाजारात तर रंगबिरंगी, छोट्या, मोठ्या आकाराच्या छत्र्‍या, रेनकोट, गमबुट इत्यादी विक्रीला ठेवतात. पाउस आला की आम्ही खूप मज्जा करतो. पावसाळा आला आणि मी भिजले नाही असे कधीच झालेल नाही. विज कडाडते, ढग गडगडतात आणि मग थंब थेंब पडायला लागतात. मस्त मातीचा वास सुटतो. आणि थोड्याच वेळात जोराचा पाऊस सुरू होतो. पावसाळ्याची ही सुरूवात मला खूप खूप आवडते. जेव्हा विज कडाडते तेंव्हा मला थोड घाबरायला होत, पण त्यानंतर येणाऱ्या धोधो पावसात भिजायची मजा काही वेगळीच असते. पावसाळा आला की आम्ही भोलानाथला पण शोधतो व विचारतो,

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय

शाळेभौवती तळे साचून सुट्टी मिळेल काय.  

पाउस आला की आम्ही खूप मज्जा करतो. आई कितीही रागावली तरी गारा पडल्या तर ते खायच, कागदाची होडी करून ती वाहत्या पाण्यात सोडणे व कुणाची होडी दूरवर जाते ते बघणे. शाळेत असतांना पाऊस आला की शिक्षकांना सुट्टी देण्याचा आग्रग करणे, सुट्टी होताच पाऊस थांबण्याची वाट न बघता धावत पळत, रस्यावर साठलेल पाणी उडवत घरी येणे.

पावसाळा येताच वातावरण  प्रसन्न होत. पाण्याला जीवन म्हटलं जातं. त्यामुळे पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे. मी पावसाची वाट आतुरतेने पाहत असतो कारण तो उन्हाळ्याच्या असहनीय गरमी पासून आपली सुटका करतो. तो हवेत थंडावा आणतो.

पाऊस सुरू झाला की सगळीकडे पाणीच पाणी असते. झाडांना छान पाणी मिळते. घरांची छपरे धुवून निघतात. मन प्रस्सन होते. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाचअसतो. मोठ्या माणसांची मात्र तारांबळ उडालेली असते. कुणाच्या घरात छतावरून पाणी पडत असते, तर कुणाच्या तरी अंगणात ढोपरभर पाणी साचलेले असते. मग घरातील माणसाची दुरुस्तीसाठी धावपळ होत असते. परंतु आम्ही लहान पोर मात्र पडणाऱ्या पावसाचा आनंद मनसोक्त घेत असतो.  

पाऊस  म्हणजे निसर्गाची एक अजब देणच आहे. माणसांना, पशु-पक्षांना , झाडे -वेलींना पाण्याची फार गरज असते, ती गरज ह्यामुळे भरून येते. पावसाचे पाणी  अडवून धरण, विहिरी, तलाव अशा ठिकाणी साठवून ठेवले जाते. नद्या, झरे, नाले यातील वाहणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते. परंतु नद्यांचे पाणी अडवून शेतकरी आपल्या शेतात पिके पिकवतात. कुणी भाजीपाला उगवतो व विकतो तर काही शेतकरी मोठ्या बगीचा तयार करतात व अनेक फळांचे उत्पादन घेतात. झाडे, वेली, फुले बहरतात. 

पण हाच पाऊस कधीतरी कोठेतरी मानवाचे खूप नुकसान देखील करतो. कधी प्रचंड पाऊस पडून नद्यांना पूर येतो, समुद्राला मोठी भरती येऊन पाणी शहरांत, गावांत वाहत येते व माणसांचे खूप नुकसान होतो.  डोंगर, दरडी कोसळतात व माणसांची नाहक जिवित हानी होते. तेव्हा मला खूप दुःख होते. परंतु पावसाचे चांगले गुण बघितल तर पावसाळा हा ऋतू मला खूपच आवडतो.

Answered by utkarshkore07
141

Answer:

this is answer of Maza aavadata rutu

Attachments:
Similar questions