maza avdta prani in marathi
Answers
Answer: here's your answer
माझा आवडता प्राणी
फोर्थ च्या टिचरानी मुलींचे एसएज् वाचायला घेतले.विषय होता.माझा आवडता प्राणी .कुणी मांजरावर लिहिलं होतं,
एक दोघीनि घोड्यावरहि लिहीलं होतं ,पण बहुतेकिंचा आवडता प्राणी अर्थातच होता कुत्रा.चौथीच्या मुली भाषा
विषयाच्या या प्रकारात मोठ्यांची मदत घेतात,हे त्याना नवीन नव्हतं. मात्र मनोगत स्वत: विद्यार्थीनीचं असावं असा त्यांचा आग्रह असे.अनयाचा निबंध तिनं तिच्या शेजारच्या दीदी च्या साहाय्यानं लिहिला होता.तो कुत्र्यावरच होता.तो त्याना
खूपच भावला होता.तिनं लिहिलं होतं------------
माझा आवडता प्राणी----
"माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. आमच्या घरी आम्ही एक कुत्रा पाळला आहे. त्याचे नांव आॅस्कर आहे.
तो जर्मन शेफर्ड आहे. मी जन्मले तेव्हांच त्यालाहि घरी आणलं असं मम्मा म्हणते.त्याला माझी खुप
सवय आहे. त्याला आम्ही पिंजर्यात ठेवतो. कारण माणसं त्याला घाबरतात.माझ्याशी तो खूपच दंगामस्ती करतो. उभा
राहून तो माझे खांदे पुढच्या दोन्ही पायानी धरून ठेवतो. माझे मनगट चावतो,पण जखम न होऊ देता,हं!
खूप जोराने पळतो. मी पकडायला लागल्यावर अजून लांब पळतो.शेवटी त्याच्या लांब पट्ट्यावर पाय ठेवून त्याला धरावे
लागते.तो माझा व मी त्याची जीव की प्राण आहोत.
पण गेले कांही दिवस त्याला बरे नाही. तो अन्नाला शिवत नाही.सारखा पिंजर्यात पडून असतो. त्याच्या अंगावर कांही
जखमाहि झालेल्या आहेत त्याच्या भोवती माशा फिरत असतात. डॅडीनि डॉक्टरना आणले होते. तो आता म्हातारा
झाला असे कांही डॉक्टर म्हणत होते.औषध नको ते म्हणाले. म्हणजे काय? आजोबाहि म्हातारे आहेत मग ते औषध
कसे घेतात?
काल रात्री डॅडी ,"उद्या सकाळी त्याला पेढे घालू "म्हणताना मी ऐकले. त्याचा अर्थ काय?
आज मी शाळेतून आल्यावर मी पिंजर्याकडे गेले तर तो तिथे नव्हता. मी मम्मीला विचारल्यावर त्याला डॉक्टरांकडे
नेले म्हणून मम्मा म्हणाली.पण दुसरा डॉगी आणू बोलली.त्या नारळाच्या झाडाकडे जावू नको असंही बोलली.माझा
आॅस्कर आता कुठं असेल?"
मार्कांच्या बाबतीत नेहमीच कंजूष असणार्या टिचरांकडून या
खेपेला १० पैकी १० कसे दिले गेले त्यांचं त्यानाच कळलं नाही.
आणि मुलींच लक्ष नाही पाहून हलकेच डोळ्याला
रुमाल लावला.
Explanation: