Hindi, asked by savitajaiswar9727, 1 year ago

Maza Bharat Desh in Marathi essay

Answers

Answered by rkluthra1964
18

भारत माझा देश आहे . माझा देश प्राचीन व महान आहे.

माझ्या देशाच्या उत्तरेला हिमालय आहे . माझ्या देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. माझ्या देशात खूप नद्या आहेत. गंगा,यमुना, यांसारख्या मोठमोठ्या नद्यांमुळे माझा देश संपन्न झाला आहे .

माझ्या देशातील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत . ते सर्व खेड्यामध्ये राहतात . दिल्ली, मुंबई यांसारखी अनेक महानगरे माझ्या देशात आहेत . या शहरामध्ये मोठमोठे उदयोग आहेत .

माझ्या देशात अनेक खेळाडू , कलावंत , शास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत . त्यांनी भारताची कीर्ती जगभर पसरवली आहे. माझ्या देशात भिन्न भिन्न धर्माचे लोक राहतात; तरीही आम्ही सर्व भारतीय एक आहोत . तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे .

माझा भारत देश हा थोर व पुण्यवान माणसांचा देश आहे. माझा देश मला खूप आवडतो . 



If u liked pls mark as BRAINLEST...

Answered by Mandar17
13

माझा भारत देश खूप महान आहे. आम्ही भारतीय आई समान या देशाला मानतो . हा आशिया खंडातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. भारताची लोकसंख्या 100 दशलक्ष  पेक्षा जास्त आहे. हा देश  जगातील सर्वात मोठ्या  लोकशाही प्रणालीचा देश आहे. भारतात उत्तरेला हिमालय तर दक्षिणेला हिंद महासागर आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर तर पश्चिमेला अरबी समुद्र ठाम उभा आहे.

हा तोच देश आहे ज्याला सोने की चिडिया असे म्हणतात. आपल्या देश शंभर वर्षा पेक्षा अधिक वर्षे पारतंत्र्यात अडकला होता. यामुळे भारतातील विकास कार्यात एक अडथळा येत  गेला . पण आता विकासाचा दरवाजा उघडला आहे. तो दिवस दूर नसेल जेव्हा भारत जगत सर्वोच स्थानावर असेल .  

भारत देश धर्मनिरपेक्ष देश आहे. विविध धर्माचे लोक ज्यात   हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध, जैन इ . सगळेजण शांततेने आणि प्रेमाने राहत आहेत. त्यांचे पुजास्थान देखील याच देशात आहे. सर्व मिळून भारताची सुंदरता अधिकच वाढवत आहेत. जगातील सातवे आश्चर्य ताजमहाल ते देखील माझ्याच देशात आहे. येथे राम कृष्णाने जन्म घेतलं होता.ऋषीमुनींनी देखील याच देशात वेदांचा शोद लावला. या देशात सुंदर कश्मीर जसे आहे तसे  विशाल वाळवंट देखील आहे. माझ्या भात देशात धनधान्य भरपूर आहे आणि जे आम्हाला हवे आहे ते भारत माता आम्हाला देत आहे.

Similar questions