India Languages, asked by VINIT7072, 1 year ago

Maza Desh essay in Marathi

Answers

Answered by Anonymous
971
भारत माझा देश आहे . माझा देश प्राचीन व महान आहे.

माझ्या देशाच्या उत्तरेला हिमालय आहे . माझ्या देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. माझ्या देशात खूप नद्या आहेत. गंगा,यमुना, यांसारख्या मोठमोठ्या नद्यांमुळे माझा देश संपन्न झाला आहे .

माझ्या देशातील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत . ते सर्व खेड्यामध्ये राहतात . दिल्ली, मुंबई यांसारखी अनेक महानगरे माझ्या देशात आहेत . या शहरामध्ये मोठमोठे उदयोग आहेत .

माझ्या देशात अनेक खेळाडू , कलावंत , शास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत . त्यांनी भारताची कीर्ती जगभर पसरवली आहे. माझ्या देशात भिन्न भिन्न धर्माचे लोक राहतात; तरीही आम्ही सर्व भारतीय एक आहोत . तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे .

माझा भारत देश हा थोर व पुण्यवान माणसांचा देश आहे. माझा देश मला खूप आवडतो . 


VINIT7072: thanks for answer
Answered by srushti200785
11

Answer:

माझा देश

माझा देश भारत आहे व मि एक भारतीय नागरिक आहे. भारताला India व हिंदुस्तान या नावाने सुधा ओळखले जाते. माझा देश प्राचीन व महान असूनच तो विश्वप्रसिद्ध आहे.

माझ्या देशाचा भूगोल सांगयचा झाला तर उत्त्तरेला गगनाला भिडणारा हिमालय आहे, तर इतर दिशानं मदे सुंदर असा समुद्र किनारा आहे. भारता मदे वर्षभर वाहणाऱ्या मोठ मोठ्या नद्या आहेत ज्या जगप्रसिद्ध आहेत जसे कि गंगा, यमुना, सरस्वती.

माझ्या देशा मदे २९ राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यात विविध जत्ती व धर्मा ची लोक राहतात. प्रत्येक जती धर्मा ची लोक सुख शांती ने व आनंदात राहतात असा माझा देश आहे. देशा मदे शेती हा मुख्य वेवसाय आहे तर मुंबई, दिल्ली अश्या मोठ्या शहारा मदे मोठे उदयोग चालतात.

माझा भारत देश इथल्या संस्कृती तसेच इकडचे किल्ले व जगातील एक आजूबा असणार्या ताजमहाल साठी खूपच प्रसिद्ध आहे. भारता मदे साजरा होणारे सन पाहायला संपूर्ण जगातून पर्यटक येतात. तसेच भारता मदे अनेक गाजलेले खिलाडू, कलावंत व शास्त्र्तज्ञ राहतात जे विश्वप्रसिध आहेत.

माझ्या देशात विविध जाती धर्मा ची लोक रहात असली तरी आम्ही सगळे भारतीय आहोत आणि त्यचा आम्हा सर्वांना गर्व आहे. भारत देशाला थोर व पुण्यवान माणसा लाबली आहेत. असा विविधे ने भरलेला माझा देश मला खूप खूप आवडतो व तो मला माझा जीवा पेक्षा हि जास्त प्रिय आहे.

Similar questions