India Languages, asked by Vishwampatidar3680, 9 months ago

maza pahila railway Pravas marathi essay

Answers

Answered by lavanyawankhede
23

Answer:

रेल्वे प्रवास... मला माझ्या लहानपणा पासुन हा प्रवास अत्यंत ओढ लावणारा,उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे... झुकझुक अगीन गाडी... लहानपणी कोळशाच्या इंधनावर चालणार्‍या गाड्या फार वेगळा प्रवासाचा अनुभव द्यायच्या... धूर,खिडकीतुन बाहेर पाहण्याचा प्रयत्न केल्यास डोळ्यात जाणारे बारीक कोळश्याचे कण ! आणि त्यामुळे डोळा लाल होउन पाणी यायचे... अश्या अनेक आणि अगणित आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत. निरिक्षण करत प्रवास करणे ही माझी आवड आणि सवय सुद्धा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी टिपण्यास,समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत होते.

आता डिझेल आणि इलेक्ट्रीक पॉवरवर धावणारी इंजिन्स आहेत... आणि यांच्या प्रवासातुन सुद्धा वेगळा आनंद मला मिळतोच ! :)

२०११ साली इंदुरला जाताना मी काही फोटो प्रवास करताना टिपले ते आज इथे देत आहे... तुम्हाला ते आवडली अशी अपेक्षा करतो. :)

सकाळी उठल्यावर रेल्वेच्या डब्यातुन फोटो काढण्यास सुरुवात केली, अर्थात पहिला फोटो रेल्वेच्या बोगीचा काढुन मग मी इतर फोटो काढण्यास सुरुवात केली...

अनेक वेगवेगळे लोक,वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या स्थानकांवर उतरणारे आणि चढणारे...कधी सहकुटुंब प्रवास करणारे,तर कधी एखादा एकटाच प्रवास करणारा व्यक्ती... मधेच येणारे विक्रेते,भेळवाले,भीक मागणारे तर चेकींगसाठी अचानक चक्कर टाकुन जाणारे रेल्वे सुरक्षा दल. प्रत्येक प्रवास एक वेगळा अनुभव देणारा असतो...या प्रवासात भेटणारे,गप्पा मारणारे,भांडणारे परत या प्रवासात एकमेकांना भेटणार सुद्धा नाहीत... तरी सुद्धा काही काळ प्रत्येक जण या प्रवासाच्या अनुभवातुन एकत्रपणे जात असतो...

मला प्रवासात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुंनी दिसणार्‍या अनेक गोष्टी पहायला फार आवडतात... शेत, रस्ते, नद्या, पूल वेगवेगळ्या पद्धतीने नांगरलेली, नुकतीच कापणी झालेली, हिरवीगार, मधेच एखादे झाड असणारी, भाजणी झालेली, एखादा मळा असलेली असे अनेक प्रकार या पळत्या प्रवास पहायला मिळतात.

Answered by simi495285
1

please mark me as brainliest

Attachments:
Similar questions