Mazha aawadta chand essay in marathi
Answers
Answer:
छंद म्हणजे काय? आपल्या मोकळ्या वेळातला विरंगुळा. तशा माझ्या विरंगुळ्याच्या खूप गोष्टी आहेत; जसे संगीत ऐकणे, क्रिकेट खेळणे, टीवी पाहणे, चित्रकला आदी. पण माझा आवडता छंद आहे वाचन. तसे वाचन हे कंटाळवाणे समजले जाते आणि माझ्या वयाची मुले-मुली तर वाचणं पूर्णपणे टाळतात. वाचन मला ऐवढे आवडते की मी फक्त ते फावल्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास, खेळ, प्रकल्पांमधून वेळ काढतो
सर्वसाधारणपणे वाचनाच्या छंदाबद्दल खूप गैरसमज आहेत. वाचन हे कंटाळवाणा मानले जाते. वाचन म्हणजे फक्त पाठ्य पुस्तक वाचणे नाही. तुम्ही करमणुकीसाठी कॉमिक्स वाचू शकता, विविध प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा आहेत, गोष्टींची पुस्तके, विविध मॅगझिन्स आणि भरपूर काही. कुणाला काव्यवाचन आवडू शकते तर कोणाला मराठी साहित्य आवडू शकते. मला मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी साहित्य, गोष्टी,आर्टिकल्स, ब्लॉग वाचायलाही आवडते.
अजून एक गैरसमज जो मुलांना वाचनाच्या छंदापासून परावृत्त करतो तो म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते. हे सरासर चुकीचे आहे. वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा वाटला नाही पाहिजे. वाचन हे मजा म्हणूनही करता येऊ शकते, त्यातून निराळ्या प्रकारचा आनंद मिळतो
if it helps you pls mark as brainliest