mazhe shikshak ani samskar 1 para on this I'll give what ever u want xd
Answers
आई-वडिलांप्रमाणेच आपल्याला घडविण्यात महत्त्वाचा वाटा असतो, तो म्हणजे शिक्षकांचा. एखादी चुकीची गोष्ट केली की त्यासाठी शाळेला आणि अनायसे शिक्षकांना जबाबदार धरलं जातं. त्यामुळे शिक्षकानी विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन केवळ ज्ञान देऊन समृद्ध करीत नाहीत तर त्यांना आयुष्य कसे जगावे, याबाबतही मोलाचं मार्गदर्शन करत असतात. बोबडं बोलायला लागल्यापासून ते नोकरीला लागेपर्यंतच्या प्रवासात शिक्षक आपल्याला घडवत असतात. म्हणूनच प्रत्येकाच्या मनात शिक्षकांविषयी आदरयुक्त प्रेमाची भावना असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा शिक्षक असतो, जो विद्यार्थ्याच्या मनात कायमचं आदराचं स्थान पक्क करतो. आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, अशाच शिक्षकांविषयी. तर मग वाट कसली पाहताय, तुमच्या आवडत्या शिक्षकाविषयी आम्हाला येथे कळवा. त्यामध्ये तुमच्या शिक्षकाचे आणि शाळा किंवा महाविद्यालयाचे नाव लिहायला मात्र विसरू नका. काही निवडक अभिप्राय लोकसत्ता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
Hope this helps you
Please mark me as brainliest