Mazi ajhi essay in marathi
Answers
माझी आजी
माझी
आजी सर्वात चांगली. घरातील वरीष्ठ व्यक्ती आहे माझी आजी. आजोबा गेल्यावर तिनेच घर
सांभाळल. आपल्या दोन्ही मुलांना एकच धाग्यात बांधून संयुक्त कुटूंब राखून ठेवणारी
माझी आजी.
दिसायला
तर सुंदर आहेच ती आणि त्यासोबत सर्वगुणसंपूर्ण. आमच्याकडे आई, बाबा, काका, काकू
सर्वच नौकरी करतात. आम्हा भावंडाना साभाऴते आजी. शाऴेतून आल्यावर सर्वप्रथम ती
आम्हाला खाऊ घालते. सांयकाऴी तुळशीला दिवा लावून, देवापूठे शुभंकरोती म्हणून अभ्यासाला
बसवते ती आम्हाला.
आजीला
वाचनाची खूप आवड. ती स्वतः छान छान गोष्टी वाचते आणि आम्हाला ते एकवते. आई, बाबा,
काका व काकू सर्वांची काळजी घेते. रिकाम्या वेळात देवळात किर्तनाला जाते. घरात
कुणालाही कुठलीही अडचण आली तर मग त्यातून बाहेर निघनास मदद करते माझी आजी. आम्हा
भावंडात वाद झाला तर ते अगदी सरळ पणे सोडवणे जमते ते फक्त आजीलाच. हे तर माझ्या
एकाच आजी बद्दल सांगन झाल. ही आहे माझी बाबांची आई.
आणखी एक
आजी आहे मला, माझ्या आईची आई. सुट्यांमध्ये जेव्हा मी मामाच्या गावाला जातो. तिथे
असते माझी आणखी एक आजी. जेव्हा मी मामाच्या गावाला जातो तेव्हा आजी माझे सर्व लाड
पुरवते. माझ्या आवडीच खानपान बनवते. मला एकदम, छान व मज़ेदार गोष्टी सांगते.
मला तर
खूप अभिमान वाटतो कि मला दोन आजी आहेत. या वरीष्ठ व्यक्तिच्या छत्रछायेत आम्ही मोठ
होत आहोत.