World Languages, asked by kumarmane1206, 10 months ago

mazya svapnatil village essay in marathi​

Answers

Answered by SelfieQueenShreya
1

Answer:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य आणि मांडलेली भूमिका एकविसाव्या शतकातही तितकीच उपयोगी आहे. आदर्श गाव कसं असावं, याविषयी तुकडोजी महाराजांनी मांडलेले हे विचार. त्यांच्या जयंतीनिमित्त…

ग्राम्सुधार्नेचा मुल मंत्र।

सज्जनांनी व्हावे एकत्र।

संघटना हेच शक्तीचे शुत्र।

ग्राम्राज्या निर्माण करी.

मित्रांनो! आदर्श ग्रामनिर्माण योजना हा आजच्या युगाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकेकाळी यज्ञाला जे महत्त्व होते ते महत्त्व आजच्या काळी या योजनेला आहे. आपल्या प्रत्येक गावाला आज फार पुढे जावयाचे आहे. राज्याचे किंवा राष्ट्राचे केंद्र दिल्ली नसून आपले प्रत्येक गाव आहे. आपण आपले गाव आदर्श करू तरच राष्ट्र सुखी, समृद्ध, सामर्थ्यवान व उन्नत होईल.

गावा-गावातून आपण सुरू केलेले कार्य पाहण्यासाठी दिल्लीचे थोर-थोर नेते येत आहेत. येत राहतील. अनेक पुढारी मला आपल्या छोटय़ा-छोटय़ा खेडय़ातील कार्यासंबंधी मोठय़ा आस्थेने विचारीत असतात. अशी चिमुकली गावे आदर्श झालेली पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. पूज्य महात्मा गांधीजी किंबहुना आपल्या सर्वच संतमहात्म्यांची इच्छादेखील हीच होती.

पुढार्यांनी आमच्या गावाला भेट द्यावी हे भूषणावहच आहे, पण केवळ त्यासाठी आपले काम होता उपयोगी नाही. नाहीतर त्यात तकलादूपणा-दिखाऊपणा येईल. आपल्याला कार्याची धुंदी चढली पाहिजे, आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. भक्त पुंडलिकाने आईबापाची सेवा एकनिष्ठेने केली. त्यावेळी देव वैकुंठातून त्याचेकडे आले नि म्हणाले, पुंडलिका, मी प्रसन्न झालो आहे, माझे दर्शन घे. पुंडलिकाने म्हटले – देवा! ज्या आईबापाच्या सेवेमुळे तुम्हाला येथे यावे लागले ती सेवा तुम्हा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, ती मी कशी सोडू? अखेर आपली सेवा चालू ठेवूनच त्याने वीट फेकली आणि तिचेवर विठ्ठलाला तिष्ठत उभे राहणे भाग पाडले.

भक्त गोर्या कुंभाराने मडकी घडवून समाजाची सेवा केली. त्यात त्याची तन्मयता इतकी झाली होती, की स्वतःचे मूल मातीत तुडवले गेले तरी त्याला भान नव्हते. मडके घडविण्यात त्याने कधीतरी बेईमानी किंवा चुकारपणा केला काय? या तन्मयतेने नि इमानदारीनेच त्याची भक्ती योगी-तपी लोकांहूनही श्रेष्ठ ठरली. गावचे काम अशाच वृत्तीने आपण केले तर तीच खरी भक्ती ठरेल! कामातच नाम घेता येईल! किंबहुना देवाचे नाम घेण्यापेक्षाही देवाचे असे काम करणेच मी अधिक श्रेष्ठ समजतो.

ग्राम आदर्श करताना श्रमदान, समयदान इत्यादी गोष्टींची अत्यंत गरज भासते, शोषकखड्डे, धान्यभांडार इत्यादी व्यवस्थाकार्ये त्यात करावी लागतात. ग्रामपंचायत नसताही लोकांनी मनात आणले तर सर्व सोयी ते करू शकतात. ग्रामपंचायत सत्तेने सुधारणा करून घेईल तर सेवामंडळ प्रेमाने समजावून करायला लावील. आपण गावाच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतो, सार्वजनिक कामांकडे कानाडोळा करतो, अशा वेळी सरकारला ग्रामपंचायत स्थापन करावी लागते आणि मग तुमचाच पैसा सक्तीने वसूल करून गावाच्या सुधारणेस लावला जातो त्यासाठी पैशाचे जागी दोन पैसे खर्च होतात, शिवाय गावात कलह माजतात. सेवाप्रेम व सहकार्याने स्वयंप्रेरणेने केलेले काम टिकाऊ होते, तसे सत्तेने होत नाही. प्रे

Similar questions