Hindi, asked by Ishika7624, 1 year ago

me aarsa boltoy marathi nibandha lekhan

Answers

Answered by divyagupta2
216

काल-परवाची गोष्ट आहे. मी आरशासमोर उभी राहून माझी मलाच निरखून पाहत होते. परवा माझ्याबरोबर काम करणार्‍या मीनाक्षी मॅडम मला म्हणाल्या, ‘मॅडम, थोडं तरी बदला. तुम्ही आता स्वत: कमावता!’

मॅडमचे शब्द आठवूनच मी मला आरशात शोधत होते. ना चेहर्‍यावर भारी किमतीच्या पावडरचा थर ना लाली. गोल चेहरा, लांबसडक केस - हसरा चेहरा. केसांतून हळूच हात फिरवला आणि माझे मलाच हसू आले. फॅशनेबल नाही, पण साध्या पोशाखातही मला मी सुंदर वाटले. मुलगा - मुलाचा अभ्यास - पती - पतीचा डबा - माझी शाळा - अभ्यास - लेखन - घरकाम या सर्व जबाबदार्‍या पार पाडतापाडता दिवसाची रात्र होऊन जाते आणि नटण्यामुरडण्यास मला वेळच मिळत नाही हो!

आमच्या ओळखीच्या एक बाई आहेत. बाई हुशार हो. आणि मॉडर्नही. दिवसातून चार ते पाच तास आरशासमोर असतात. सारखं कंगवा फिरवणं, पावडर लावणं चालूच असतं; पण घरात पाहाल तर सारं काही अस्ताव्यस्त पडलेलं असतं. कधीच मुलीचा अभ्यास घेताना दिसणार नाही. साधं बाजारात भाजी घ्यायला जायचं असलं तरी या बयेला दोन अडीच तास आधी सांगावं लागतं. तेव्हा कुठं आपल्या वेळेवर बाजारात जाता येतं. तिच्या या फॅशनेबल राहण्यात वेळ खूप जातो म्हणून गल्लीतल्या बर्‍याच स्त्रिया तिला सोबत नेण्याचं टाळतात.

आमच्या ह्यांनाही जास्त फॅशनेबल राहणं नाही आवडत हो. ते तर नेहमी म्हणतात - माणसाने साधी राहणी उंच विचार ठेवावेत. म्हणून तर ते नेहमी दिवसातून एकदा तरी मला म्हणतात, तू छान दिसतेस गं! आणि त्यांच्या या वाक्यानेच मला खूप आधार मिळून मला फॅशन करण्याची गरज वाटत नाही.

शाळेत असताना एक निबंध लिहिला होता. सूर्य संपावर गेला तर - तसंच आज मला वाटतंय, आरसा नसता तर.. आता तुम्ही एक काम करा, आरसा नसता तर या विषयावरच्या तुमच्या कल्पना मला कळवा
Answered by halamadrid
40

■■ मी आरसा बोलतोय■■

नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र एक आरसा बोलत आहे.

तुम्ही रोज स्वतःला माझ्यामुळे पाहू शकता.मी तुम्हाला तुमचा खरा रूप दाखवतो.मी नसतो तर, तुम्हाला स्वतःला पाहण्यासाठी लोकांवर आणि मोबाइलच्या कॅमेरावर अवलंबून राहावे लागेल.

माझा उपयोग कॅमेरा,सौर ऊर्जा प्रकल्प,दुर्बिण ,दूरदर्शन आणि इतर वेगवेगळ्या औद्योगिक उपकरणांमध्येही केला जातो.डेंटिस्ट सुद्धा तोंडामधील सखोल भागात असलेली सडन शोधण्यसाठी माझा प्रयोग करतात.

माझा उपयोग गाडीचालक मागून येणाऱ्या गाड्या पाहण्यासाठी करतो.मी नसतो तर, गाडी चालकाची फार गैरसोय होईल व अपघात होण्याची भीतिही वाढेल.

अशा प्रकारे मी खूप उयोगी आहे आणि मी जर नसलो तर लोकांना खूप समस्या होतील, म्हणून मित्रांनो मला जपूण वापरत जा.

Similar questions