India Languages, asked by shubhaladwivedi2778, 11 months ago

Me fada bolte essay in Marathi

Answers

Answered by titiksha06
2

Answer:

''अरेरे! काय माझी ही दुर्दशा! तुम्ही मला काळ्या रंगाने रंगवलं आहे. तुम्ही माझं तोंड काळं करून टाकलं आहे. विसरलात वाटते मला सारे जण? अरे मी तुमच्या वर्गात असलेला अविभाज्य घटक, म्हणजेच मी फळा आहे.''तुम्ही मला आकाशात किंवा जमिनीवर नाही लावले. तुम्हीतर चक्क मला दोन खिळ्यांमध्ये त्रिशंकूसारखे अधांतरी टांगवले आहे. किती वषेर् झाली, मी इथेच आहे. कुठे जाता येत नाही, कोणाशीच बोलता येत नाही. दिवसा तुम्ही मुले शाळेत येतात व माझ्या मदतीने शिकता, तेव्हा किती आनंद होतो मला! परंतु रात्री मी या काळ्याकुट्ट खोलीत एकटाच असतो. रात्र जणू खायलाच येते मला! तेव्हा मी तुमची वाट पाहत असतो. कधी सकाळ होऊन तुम्ही शाळेत येता हे पाहण्यासाठी मोठ्या आतुरतेने तुमची वाट पाहतो. तुम्हापैकी किती जण वर्गात शिक्षक शिकवत असतात, तेव्हा मागे बडबड करीत असतात. शिक्षकाला मात्र हे सर्व पाहता येत नाही, पण मी हे सर्व पहात असतो... बरोबर ना दीपक?

plz mark me as brainliest plz

Similar questions