Hindi, asked by ynaik445, 8 months ago

me krushimantri zalo tar essey in Marathi

Answers

Answered by Razaan310
1

Answer:

आयुष्याच्या प्रवासात जन्मापासून मरेपर्यंतकेलेल्या चांगल्या वाईट कर्माची गोळाबेरीज हीच माणसाच्या आयुष्याची किंमत ! श्वसन, भोजन, शयन यातच गुरफटणे म्हणजे आयुष्य नव्हे. उच्च ध्ययासाठी जगणे आणि ध्येयपूर्ती करताना वा केल्यावर देह ठेवणे हे उच्चप्रतीचे आयुष्य होय. क्षणभंगुर आयुष्यातील ती सर्वोच्च कमाई आहे. आपण आपल्या समाजाचे, देशाचे काही देणे लागतो. या देशाला, समाजाला घडवायचे माझे स्वप्न एकाच घटनेने खऱ्या अर्थाने साकार होऊ शकेल-- मी पंतप्रधान झालो तर !

माझ्या देशाची उच्च सांस्कृतिक परंपरा, चमकदार इतिहास, त्यातील नररत्ने, सामर्थ्यशील शालीनता हे सारे मला या देशाचा पंतप्रधान होण्यास मोह पाडतात. हा काटेरी मुकुट म्हणूनच मी आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे.

आज देशातील राजकारण कसे आहे ? गटबाजी, भ्रष्टाचार, तोडाफोडाची नीती, सत्तेसाठी चाललेली लाजिरवाणी स्पर्धा...सारेच ओंगळ आहे. दारिद्र्य, अशिक्षितपणा, मागासलेपण देश खाईत नेत आहे....मी हे सारं बदलू इच्छितो. “ सोपे नाही' याची कल्पना आहे. कारण ' लोकशाही हे गाढवांचे राज्य असते' असे म्हटले जाते तिथे लाथांचा सुकाळ असणारच.

पण अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे “लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही" हे मी बिंबविण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करीन.

मी काही ' केंबिज' किंवा 'डून स्कूल'चा वारसदार नाही. मी याच मातीतला असल्याने या मातीचे प्रश्न मला चांगलेच माहीत आहेत म्हणूनच ते प्रश्न सोडवण्याच्या माझ्या प्रयत्नांना जास्त यश येईल.

आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतकरी हा केंद्रबिंदू धरून सरकारी धोरणे राबवण्याचा माझा मानस आहे. त्याला सवलती कर्जे, आधुनिक तंत्रज्ञान, खते पुरवीन पण कर्जमाफी करून त्यांची क्रियाशीलता आणि देशाची तिजोरी दुबळी करणार नाही नाही. गंगा-कावरी प्रकल्पान सारा भारत पावसावर अवलंबून न राहता

होईल. तो मी करीन म्हणजे मुकलेली जमीन अन् सुकलेला शेतकऱ्याचा चेहरा भारतात कुणाला दिसणार नाही.

तळागाळाच्या साऱ्याच जनतेला अन्न, वर, निवारा मिळालाच पाहिजे याकडे माझा कटाक्ष राहील.

पांढरपेशा वर्गाचे हाल अधिकच आहेत. कर आणि महागाईच्या कैचीत तो सापडला आहे. मी कर आकारणी सुलभ करीन. बाजारभाव नियंत्रित करीन. समाजवाद आणि भांडवलशाही या दोन्हींची सांगड मी घालीन. समाजवादाने व्यक्तिगत कौशल्य मारले जाते तर भांडवलशाहीत पिळवणूक होते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या दोन्हींचा यथायोग्य वापर मी करीन. समाजातील उच्चभ्रूना या माझ्या धोरणाचा फायदा मिळेल.

Similar questions