me pahilela preshak sthal in marathi essay
Answers
Answer:
bhai muje marathi nhi aati
◆हे प्रश्न चुकीचे आहे, अचूक प्रश्न आहे, मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ◆
■■ मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ■■
मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी माझ्या कुटुंबासोबत भुवनेश्वरला फिरायला गेली होती. भुवनेश्वरमधील बरेच ठिकाण आम्ही पाहिले.
आम्ही तिथला जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर सुद्धा पाहायला गेलो.कोणार्क सूर्य मंदिर हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. हे सूर्य मंदिर पाहून आम्ही सगळेच खूप खुश झालो. हे मंदिर सूर्य देवाचे आहे. सूर्य देवाची मूर्ती खूपच आकर्षक आणि सुंदर आहे.
सूर्य मंदिराची सर्वोत्कृष्ट वास्तूकलेने आमचे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.या मंदिराच्या भिंतिंवर केले गेलेले कोरीव काम खूपच सुंदर होते.तिथे वेगवेगळ्या प्राणी, वस्तू आणि मनुष्याचे सुंदर आणि मनमोहक आकृत्या कोरल्या गेल्या होत्या.
मंदिराच्या भोवती असलेले हिरवे गवत पाहून असे वाटत होते की तिथे हिरवी चादर पसरली आहे.हे मंदिर पाहायला बरेच लोक आले होते. सगळेजण तिथे आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत फोटो काढत होते.
सूर्यमंदिराच्या आवाराची स्वच्छता पाहून आम्ही खूप खुश झालो. मंदिराच्या बाहेर खायच्या वस्तू, खेळणी, सजावटीच्या वस्तू विकणारे विविध दुकाने होती.आम्ही तिथे थोडी शॉपिंग केली.
सूर्यमंदिरात जवळजवळ अडीच तास घालवल्यानंतर आम्ही तिथून निघालो. इथे मला खूप मजा आली आणि माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव होतो.