Hindi, asked by sayabakhan, 9 months ago

me pahilela suryast marathi nibhand​

Answers

Answered by halamadrid
38

Answer:

संध्याकाळी लोक घरी जातात.पक्षीसुद्धा आपापल्या घरी परततात.संध्याकाळी सूर्यसुद्धा जणू आपल्या घरीच परतत असतो.सूर्यास्ताच्या वेळेचा दृश्य फारच सुंदर व मनाला प्रसन्न करणारा असतो.पण आपल्या या रोजच्या दगदगीच्या जीवनात आपल्याला या दृश्याचा आनंद घेता येत नाही.

मला गावी गेल्यावर निसर्गाच्या सानिध्यात राहायला फार आवडते.तिथे मी पाहिलेला सूर्यास्त मला अजूनही आठवण आहे.

गावी आमच्या घरासमोर एक छान अंगण आहे.अंगणातून दूरचे क्षितिज दिसते.तिथून दररोज सूर्यास्ताचा मोहक दृश्य दिसतो.त्यादिवशीची सूर्यास्त काही वेगळीच होती.

संध्याकाळी ऊन हळूहळू कमी होऊ लागले.सूर्य क्षितिजाकडे सरकला. सूर्याचा रंग हळूहळू बदलू लागला.तो नारंगी रंगाचा दिसू लागला.सूर्य जेव्हा क्षितिजाकडे टेकला, तेव्हाचे दृश्य खूपच सुंदर होते.सूर्य तिथेच रहावे,असे मला वाटत होते.या दृश्याच्या सौंदर्येत सौम्य पावसाने भर घातला.आकाशात ढग दिसू लागले.सूर्यास्ताच्या वेळी हे ढग रंगीबेरंगी दिसू लागले.आकाश जणू काही रंगांनी भरून गेले होते.वातावरण अगदी प्रसन्न झाले होते.

सूर्यास्ताचा हा देखावा कधी संपू नये, असे मला वाटत होते.

Explanation:

Similar questions