me sanganak bolat ahe niband
Answers
मित्रांनो, तुम्ही जशी पुस्तकांशी मैत्री करता तशीच माझ्याशीपण मैत्री करा मग पहा, तुमच्या प्रत्येक कामात मी मित्रासारखाच धावून येतो की नाही ते!
अगदी सुरुवातीला मी जेव्हा भारतात आलो तेव्हा माझी किंमत आणि माझी घ्यावी लागणारी काळजी यामुळे सगळ्यांनाच मला स्वतःजवळ बाळगणे शक्य नव्हते; पण आता तुम्ही पाहताच की पोस्ट, बँका, मोठमोठे मॉल्स, सिनेमा तिकिटे, रेल्वे, आरक्षण, शाळा, मोठी कार्यालये, एवढेच नाही तर जवळजवळ घरोघरी माझे दर्शन तुम्हाला होते.
तुम्हाला नुकतीच शाळेत जाणारी मुले संगणकावर खेळ खेळताना दिसतील. अगदी लीलया त्यांची छोटी-छोटी बोटे माझ्या अंगाखांद्यावर फिरतात, किती आनंद होतो म्हणून सांगू? कारण हीच मुले उद्याच्या भारताची शिल्पकार असतील. आपल्या माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं “२०२० साल भारत महासत्ताक राष्ट्र बनेल" हे स्वप्न ते सत्यात उतरवतील. गेल्या काही दशकांत माझ्यामुळेच तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. असं एकही क्षेत्र उरलं नाही जिथं माझा वापर होत नाही.
radhe radhe ❤️
Answer:
mark me as the brainest answer and follow me