mhapur v paryavaran essay in marathi
Answers
Explanation:
या पृथ्वीवर राहणा All्या सर्व सजीव वस्तू वातावरणाखाली येतात. ... वातावरणामध्ये हवा, पाणी, सूर्यप्रकाश, वनस्पती, प्राणी इत्यादींचा समावेश आहे. शिवाय, पृथ्वीला विश्वातील एकमेव ग्रह मानले जाते जे जीवनाचे समर्थन करते.
■■महापूर व पर्यावरण■■
महापूर एक नैसर्गिक आपत्ति आहे,ज्यामुळे आर्थिक नुकसान होते, लोकांच्या जीवाचे व मालमत्तेचे नुकसान होते. पर्यावरणावर महापूरामुळे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीं प्रकारचे प्रभाव पडतात.
महापूरामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले आर्द्र प्रदेशांचे स्वास्थ्य सुधारते,ज्यामुळे पाण्याच्या पुरवठ्यात वाढ होते आणि हवेची गुणवत्ता सुधारते.
महापूरामुळे जमीनीच्या मोठ्यामोठ्या क्षेत्रामध्ये नदीचे गाळ वितरित होते,ज्यामुळे मातीमध्ये पोषक तत्व पुन्हा भरते,जेणेकरून जमीन सुपीक बनते.महापूरामुळे जमिनीवर माती जमा होते,ज्यामुळे जमीनीची झीज होण्यापासून थांबते.
जसे महापूरामुळे पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव होतात,तसेच नकारात्मक प्रभाव ही होतात.महापूरामुळे केमिकल आणि इतर घातक पदार्थ नद्यांमध्ये मिसळतात,ज्यामुळे नद्या दूषित होतात.यामुळे जलजन्य आजार पसरण्याची भीती असते.
महापूरामुळे जनावरांचा जीव जातो,तसेच बरेच से किडे पूरग्रस्त भागांमाध्ये दुसऱ्या भागातून आणले जातात,जेणेकरून परिसंस्थेचे नैसर्गिक संतुलन बिगड़ते.
महापूरामुळे जैवविविधतेचे नुकसान होतो. महापूरामुळे नदीचे गाळ जमिनीवर वितरित होते.जर हे जास्त प्रमाणात झाले, तर पाण्याची गुणवत्ता खराब होते व पाणी पुरवठ्यावर प्रभाव पडतो.