mi kelela pravas in marathi
Answers
Answered by
10
२७ जुलै २०१२ चा शुक्रवार. मग काय संपूर्ण तयारीनिशी मी आणि माझे मित्र तयार झालो आणि निघालो रायगडला.. रात्री १२.०० वाजता मुंबईवरून प्रवास चालू केला आणि तो सरळ रायगडच्या दिशेने.. रात्री ३.०० वाजता पोहचलो. रायगड जवळच एका मित्राच्या घरी आम्ही थांबलो. त्या रात्री आम्हाला झोप लागलीच नाही. कारण प्रत्येकाला रायगडवर जायची ओढ लागली होती.
बघता बघता ५.०० वाजले. स्नान वैगरे करून आम्ही निघालो ते थेट रायगडवर… रायगडाच्या पायथ्याशी पोहचलो तेंव्हा कळले कि स्वर्ग म्हणजे काय असतो. कसा असतो. चोहीकडे धुके पसरलेले.. आणि रिमझिम पाऊस.. अंगावर ज्याकेट चढवले.. आणि निघालो पायर्यांच्या दिशेने पहिल्याच पायरीला वंदन केले आणि तिच्या मातीचा टिळा कपाळी लावला आणि पायर्या चढू लागलो. चढता चढता वाटेतील कोसळणाऱ्या धबधाब्यांवर आनंद लुटत आम्ही झप झप पायर्या चढू लागलो. जस जसा गड जवळ येत होता. तस तसा त्याला डोळ्यात भरायला जीव आतुरला होता. गडाचा माथा कधी धुक्यात हरवत होता तर कधी दुरूनच दिसत होता. हिरवीगार चादर अंगावर ओढलेला सह्याद्री मनात भरत होता. सह्याद्रीचे कडे नटून दिसत होते. वरून दिसणारी छोटी छोटी गावे हाकेच्या अंतरावर भासत होती. आणि आता पावसाने पण आता चांगलाच जोर धरला होता. सोसाट्याचा वारा आणि दाट धुके आणि जोरदार पाऊस यात बाजूला उभा असणारा मित्र ही दिसत न्हवता..
गडावर पोहोचताच समोर होळीच्या मांडावरील शिवमूर्ती पाहून जो काही हर्ष मनात झाला त्याच वर्णन मी करूच शकत नाही. गुगल वर रायगड सर्च केल्यावर ज्या शिवमूर्तीचे दर्शन व्हायचे. ती शिवमूर्ती समोर पाहून डोळे भरून आले. जावून सरळ राजांचे पाय धरले. डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आणि मस्तक झुकवून एक मुजरा केला. शिवचरणाची धूळ कपाळी लावली आणि हातात असणारा भगवा त्या मूर्तीच्या शिवछ्त्राला बांधला.. राजांना डोळे भरून पाहत.. पाहतच बसलो..
यावरून दोन ओळी मनात येवून गेल्या..
“काय तुमचे रूप राजे काय तुमचे तेज
छत्रपती जगताचे तुमची गरुडाची झेप
शिवशंकर तुम्ही या कैलासाचे राणा तुम्ही या स्वराज्याचे
सिंहासन विराजित गोब्राम्हण प्रतिपालक रक्षक तुम्ही रयतेचे
तुमचे चरण स्पर्श करुनी आज पाणी डोळा आले..
राऊळ तुमच पाहुनी मन मनात आनंदले
छाती फुगली गर्वाने…. तुम्हास पाहीले राजे.. मी आज तुम्हास पाहीले”
होळीच्या मांडावरून सरळ निघालो तो जेथे शिवराज्याभिषेक झाला.. मराठ्यांचा राजा छत्रपती झाला.. जिथे आई जिजाऊंच्या डोळ्यात आनंदाश्रू आला.. जिथे राजांना आपला बाजी, तानाजी आठवला.. जिथे कित्येक बलिदानाचा… वीरांचा सत्कार झाला… तिथे मी पोहचलो होतो. तिथेच रयतेचा पोशिंदा छत्रपती झाला… ती जागा त्या जागेचा प्रत्येक कोना मी मनात साठवत होतो.. तो भव्य दरबार पाहून.. मन थक्क झाले होते. तिथे असणाऱ्या सिंहासनारूढ राजांचे दर्शन घेवू लागलो आणि एक जोरात आरोळी ठोकली आणि माझ्या मित्रांनीही मला साथ दिली ती आरोळी म्हणजे.. माझ्या राजाचे गुणगान.. माझ्या राज्जाचे कर्तुत्व.. त्यांचा पराक्रम.. त्याचं रयतेवर असणार प्रेम… ती आरोळी म्हणजे एक समृद्ध शिवराज्य
“प्रौढम प्रताप पुरंदर. क्षत्रिय कुलवंत गोब्राम्हण प्रतिपालक
हिंदवी स्वराज्य संस्थापक ब्रमांडनायक
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कि जय”
या गर्जनेचा नाद संपूर्ण दरबारात घुमला… माझ्या मित्रांच्या साथीबरोबरच तिथे आलेल्या शिवभक्तांचीही साथ लाभली. आणि संपूर्ण परिसर शिवमय झाला…
मग संपूर्ण रायगडाची सैर केली रायगडा बद्दल बरीच माहिती गोळा केली.. मनात ठसवली आणि छाती गर्वाने फुगत होती… जे जे काही पाहत होतो ते एक स्वप्नच भासत होत.. आजचा दिवस कदीच सरू नये… असंच वाटत होत… खुबलढा बुरुज, हिरकणीचा बुरुज, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, अष्ट मंडळाचे वाडे, राण्यांचे महाल, गोदामे, पालखी दरवाजा, मेना दरवाजा, राजभवन… नगारखाना.. बाजारपेठ…
आणि आता पावले वळली ती जगदीश्वराच्या मंदिराकडे.. शिवछत्रपतींच्या समाधीकडे… दाट धुके आणि जोराचा पाऊस यातून वाट काढत आम्ही निघालो ते जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने.. मंदिर समोर येताच पायातील पादत्राणे काढली आणि मंदिराच्या पायर्यांना स्पर्श करत आत शिरलो समोरच जगदीश्वराचे शिवलिंग आणि मस्तक तिथे टेकवले आणि “ओम नमः शिवाय” चा मंत्र बोललो आणि आवाज मंदिरात घुमला तो आवाज मनाला अशी चिरकाल शांती देवून गेला कि आजूनही त्याचा नाद कानात एकू येतोय… आणि मनात विचार आला… याच मंदितात.. येतेच बसून… याच शिवलिंगावर राजांनी अभिषेक केला असेल असेच दर्शन घेतले असेल या जागेला राजाच्या पावलाचा गंध अजूनही येत असेल… तेथील प्रत्येक चराचराला राजांचा स्पर्श झाला असेल… आणि हे सार आठवून जी काही मनाची चलबिचल झाली… जी गात झाली ती अजूनही कायम आहे… जगदिश्वराला वंदन करून बाहेर आलो आणि समोरच असणारी राजांची समाधी पाहून मन गहिवरले…“येतेच निजला माझा राजा.. येथेच झाला माझा राजा रयतेचा छत्रपती
अनंत काळासाठी वसला रायगडी.. अमर होवुनीया चराचरी…
स्वप्न साकार करून स्वराज्याचे.. घडविले हिंदवी स्वराज्य मराठ्यांचे
गुलामीची लक्तरे येतेच ठेचली.. आणि मगच शांत झाला माझा राजा रायगडी राऊळी”
आता वेळ आली होती ती परतीची…. आणि जड पावलांनी आम्ही आता गडाचा निरोप घ्यायचा ठरवला… निरोप घेताना पुन्हा होळीच्या मांडावर आलो. आणि समोरच्या शिवमूर्ती कडे पाहतच बसलो…. आता गड सोडायचा हे मन काही मानत न्हवत.. आणि मी गडाचा निरोप घेतला.. तो पुन्हा गडावर येईन अस ठरवूनच.. रायगड पुन्हा डोळ्यात अवतरला… गड सोडता सोडता या ओळी मला सुचल्या……
हे शिवराया…..
आज नयन माझे सुखावले तुझं राऊळ पाहून
रायगडाच्या शिवराजा तुला मुजरा स्मरून
कीर्ती तुझी अफाट आज पहिली डोळ्यांनी
कसा स्वर्ग नटलेला सह्याद्री डोंगरदर्यांनी
तेज तुझे पाहून शीर झुकले चरणाशी
काय गुण वर्णू सह्याद्रीचे टिळा लाविला लल्लाटी
हे शिवराया… शिवतेजा.. राजे शोभता आम्हाशी
आज धन्य झाला गणेश जव कवटाळले तव चरणाशी
I hope it will help you !! Plz mark me as brainiest!!!!!

Similar questions