Mi pahilela apghat in marathi essay
Answers
Answer:
Mi pahilela apghat in marathi essay
Answer:मी इयत्ता चौथी मध्ये असताना पाहिलेला एक अपघात अजून आठवला तरी अंगावर काटा येतो.
मी आईसोबत शाळेत जात होते. आईच्या ओळखीच्या एक काकू त्यांच्या बालवाडीतल्या मुलीला घेऊन आमच्या बरोबर चालल्या होत्या. आई आणि काकू गप्पा मारत होत्या. तेवढ्यात रस्ता ओलांडण्यासाठी आम्ही थांबलो. पण काकू मात्र मुलीला घेऊन घाईने पुढे निघून गेल्या. काही समजायच्या आत भरधाव वेगाने आलेल्या एका मोटारसायकलने काकूंच्या मुलीला उडवले. माझ्या डोळ्यासमोर क्षणभर अंधार दाटून आला. मोटारसायकलच्या धडकेने ती मुलगी दूरवर फरफटत गेली होती. तिच्या गळ्यात अडकवलेली पाण्याची बाटली दुसरीकडे फेकली गेली होती. तिच्या डोक्याला भयंकर इजा झाली होती. ती रक्ताने माखली होती. फार भयावह दृश्य होतं ते.
तेव्हापासून कितीही उशीर झाला तरीही रस्ता ओलांडताना मी अजिबात घाई करत नाही.
Explanation: