mi pustak essay in marathi
Answers
*Mi Pustak Boltoy essay in marathi*
हॅलो फ्रेंड्स ओळखलं का मला?
कसे ओळखणार तुमचा तर पोर्शन चेंज झाला आहे ना. मी आठवीतील जुने इतिहासाचे पुस्तक. सांगली मध्ये एका कारखान्यात माझा जन्म झाला. माझ्यासोबत माझ्यासारख्या अनेक मित्र मैत्रिणी देखील बनले. पण हा आमचा कारखान्यातील प्रवास संपून तो आता दुकानांमध्ये आला होता. अशाच एका दुकानात मीही विकला गेलो मला राज नावाच्या मुलाने विकत घेतले. हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता कारण पहिल्यांदाच मी एक नवीन मानवी मित्र बनवला होता.
राज माझी खूप काळजी घ्यायचा, तो मला कधीही दुमडू देत नसे. जर माझ्या पानांवर कोणी काही पेनाने लिहिले अथवा माझे पान कोणी चुर्गळे तर राजला खूप राग यायचा. राजला त्यांच्या पुस्तकांची काळजी घ्यायला खूप आवडत असे. माझे इतर पुस्तक मित्र उदाहरणार्थ गणित, भूगोल इत्यादी देखील राज बरोबर खूप आनंदित राहत. हा मुलगा त्याचा गृहपाठ रोज करायचा. दिवाळीच्या वेळी पाडव्याच्या दिवशी तो आमचे पूजन देखील करायचा. म्हणूनच देवी सरस्वती राजवर कृपादृष्टी दाखवत होते, राजला प्रत्येक परीक्षेमध्ये चांगले गुण मिळत. हळूहळू राज मोठा झाला आणि आठवीची त्यांनी शेवटची परीक्षा दिली. इतिहासाच्या परीक्षेच्या दिवशी त्याने मला शेवटचे उघडले. त्यानंतर मी तसेच बुक्षेल्फ मध्ये पडून आहे.
माझ्यासारखीच गत काही माझ्या मित्रांची देखील झाली. आठवीतील भूगोल, हिंदी, मराठी ,इंग्रजी, या सारख्या विषयांच्या वयात देखील बुक शेल्फ मध्येच पडून होत्या. आमच्यावर हळूहळू धूळ साठू लागली. ह्या धुळे मुळेच मला खूप त्रास होऊ लागला ,कसेतरीच वाटायचे. माझे काही मित्र रोज रडत देखील पण हा आमच्या आयुष्यातील एक टप्पा होता जणू. राज मोठा होऊ लागला व नववी नंतर तो दहावीत उत्तीर्ण झाला आणि दहावीच्या परीक्षेत देखील त्यांनी त्याची बाजी मारली. एके दिवशी सहज राजच्या आईने त्याला त्याची पुस्तक काढायला सांगितली व त्याचे शेल्फ नीट लावायला सांगितले. आमच्या साथीला आता नववीची पुस्तक देखील रडू लागली होती. बुक सेल्स उघडताच राजचा आवडता विषय इतिहास असल्यामुळे त्याची नजर माझ्यावर पडली. व त्याला त्याचे आठवीचे इतिहासातील भाग आठवू लागले. राज हा मनाने हळवा असल्यामुळे त्याला किंचित रडू देखील आले.
आमच्या सारख्या पुस्तकांना रद्दीमध्ये देऊ नये म्हणून राजने आठवी नववी व दहावीची पुस्तक एका अनाथ आश्रम मध्ये दान केली. राज हा मनाने खूप हळवा व प्रेमळ होता म्हणूनच त्याला मुलांची प्रेम करायला खूप आवडायचं आणि हेच उद्दिष्ट साधून त्यांनी आमचा वापर इतरांना व्हावा अशी आशा करत हे दान-धर्म केलं. आता अनाथाश्रमातील पोरं आमचा वापर करतात व आम्हाला याची खूप मजा येते आणि राजते खूप कौतुक वाटते. राज सारखा पुस्तकी मित्र सगळ्या ना मिळावा हीच माझी अपेक्षा. धन्यवाद राज.
Explanation:
hiii guys kese ho mast na op bolte or kya chal raha hai