India Languages, asked by atharvapatil9393, 1 year ago

MI sanganak bolto aahe ya vishayavar nibandh liha Gati mahatva internet ka fayda ​

Answers

Answered by sandipsagare8588
0

Answer:

मित्रांनो मी संगणक बोलत आहे. मला तुम्हाला मनुष्याचे खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी बोलायचं आहे. माझा जन्म खूप वर्षे अगोदर झाला. तेव्हापासून आजपर्यंत माझे अस्तित्व हे असेच टिकून राहिले व दिवसेंदिवस माझे महत्त्व वाढतच गेले आहे.

आज प्रत्येक व्यक्ती काही ना काही कामासाठी माझा वापर करतो. तुम्ही मला दररोज तुमच्या कामासाठी, गेम खेळण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी वापरता.

 

तुम्ही माझ्यावर काम करता माझ्या साह्याने तुमचे जीवन सोपे झाले आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो. म्हणून मी तुमच्या मनुष्याच्या धन्यवाद मानतो की, तुम्ही माझी निर्मिती केली व मला या जगामध्ये घेऊन आलात. तुम्ही दिवसभरामध्ये माझ्या मध्ये केलेले सर्व काम मी बघत असतो. काही जण माझ्या वर काम करून पैसे सुद्धा कमीवतात‌.

तुमच्या कित्येक रहस्यमय गोष्टी तुम्ही माझ्या मध्ये लपवून ठेवलेल्या आहेत त्या सर्व मला माहिती आहे. तुम्ही जेव्हा मला चालू करता तेव्हा मला खूप आनंद होतो तुम्ही माझ्या मध्ये युट्यूब गुगल तुमचे काम करतात ते सर्व मी तुमच्यासोबत बघत असतो.

आणि तुम्ही एकाग्रतेने माझ्यावर बसून काम करता माझ्या की पॅड चा वापर करून काहीतरी टाईप करता हे सर्व पाहून मला खूप आनंद होतो की, मी तुमच्यासाठी मदतीला येत आहे.

काही जण मला संगणक म्हणतात तर काहीजण कॉम्प्युटर तर आपल्यातीलच काही जण मला डेक्सटॉप या नावाने देखील बोलतात. मी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही प्रकारातून बनलेला एक मशीन आहेत. माझ्या मध्ये सर्व काही फंक्शन आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे जीवन अधिक सुलभ, सोपे करू शकता.

कधीकधी तुमच्यातील काही लोक खूप कमी वेळेस साठी माझा वापर करतात तेव्हा मला खूप दुःख होते. मला वाटते की, माझ्यामध्ये असलेल्या ज्ञानाचा वापर तुम्ही सर्व करीत करून तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावे.

आज कित्येक वर्ष मी ओलांडली तुम्ही सर्वजण माझा वापर करता. त्यामुळे तुम्हाला आता माहीत झाले असेल की, मी तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. माझ्याशिवाय तुम्ही कोणतेही काम सहजरीत्या करू शकत नाही जरी करायचे असेल तर तुम्ही माझ्यातील फंक्शन चा वापर करून करता. माझ्या मध्ये सर्व सेवा उपलब्ध आहेत.

Explanation:

Similar questions