Computer Science, asked by harshadraje45, 8 months ago

mobile tantradnyan fayde thodkyat liha​

Answers

Answered by ap7465568
0

Explanation:

मोबाइल फोनचा जन्म झाला आणि जगात मोठी संपर्कक्रांती झाली. भारतात तर बघताबघता गरीब-श्रीमंत, मालक-कामगार, स्त्री-पुरुष सर्वांच्याच कानाला मोबाइल लागला; कारण त्याचा उपयोगच तसा होता. पण या उपयुक्त मोबाइलचा दुरुपयोगही सुरू झाला. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या आवाजात त्यावरून बोलणे, अश्लील एसएमएस पाठविणे, वाहने चालविताना अपघात होण्याची तमा न बाळगता त्याचा वापर करणे वगैरे वगैरे. त्यामुळे मोबाइल जितका उपयुक्त ठरला, तितकीच उपदवीही ठरला. तेव्हा मोबाइल कसा वापरावा, केव्हा वापरावा, त्यावर कसे बोलावे याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

दुरुपयोग थांबवाच

मोबाइलमुळे जगात क्रांती झाली हे खरेच! तसं बघितलं तर मोबाइल वरदानच ठरावा. कुठेही कधीही आपल्याला आपल्या माणसांना मित्रपरिवाराला, आणीबाणीच्या वेळी, महत्त्वाच्या कामासाठी मोबाइलमुळे संपर्क साधता येतो. आता मोबाइल सर्व थरांतील माणसं वापरायला लागलीत. त्यामुळे त्याचा दुरुपयोगही होऊ लागलाय. हे थांबवलं पाहिजे. त्याचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करावा. सार्वजनिक ठिकाणी, वाहन चालवताना मोबाइलचा उपयोग व्यवस्थित करावा. वाहन चालवताना तर मोबाइलवर बोलूच नये. अश्लील एसएमएस करणाऱ्यांना शोधून काढून, जबर शिक्षा द्यावी. त्यांचे मोबाइल जप्त करावेत. मोबाइलचा अति वापर केल्याने आपल्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्यतो मोबाइल वापरणाऱ्यांनी त्याच्या उपयुक्ततेचा विचार करूनच वापर करावा. त्याचा दुरुपयोग होऊ देऊ नये. तो शाप नसावा.

Similar questions