mothya bhavala vadhdivsachya shubhechha denare Patra
Answers
"वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र"
Explanation:
स्वप्न बंगला,
सेक्टर -३,
राजदीप लेन,
कल्याण(पू)
दिनांक: १० मे,२०२१.
प्रिय दादा,
सप्रेम नमस्कार.
तू कसा आहेस दादा? आशा करते की तू आणि घरातले सगळेजण ठीक असणार.
तुझ्या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी तुला हे पत्र लिहीत आहे. माझी परीक्षा असल्यामुळे मला तुझ्या वाढदिवसाला घरी तुला भेटायला येता आले नाही.
पण, आईच्या पत्राद्वारे कळले की तुझ्या वाढदिवसाची मोठी पार्टी झाली होती. तुमचे सगळ्यांचे फोटो पाहून फार आनंद झाला.
दादा तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुला आयुष्यात खूप यश आणि सुख मिळो हीच देवाकडे प्रार्थना करते.
मी आशा करते की यावर्षी तुला त्या सगळ्या गोष्टी मिळतील ज्या तुला हव्या होत्या. तुझ्या जीवनातील हा वर्ष तुझ्या आयुष्यात चांगले स्वास्थ्य आणि खूप आनंद घेऊन येईल.
पत्रासोबत तुझ्यासाठी एक भेट पाठवली आहे. घरातील सगळ्यांना माझे नमस्कार सांग.
तुझी लाडकी बहीण,
सोनाली.