India Languages, asked by Jashanrpr37841, 10 months ago

My father in Marathi of essay of ten line

Answers

Answered by ehsanmughal28
0

Answer:

ok very bust of luvk bro Ahead

Answered by sangeetadas590
0

Answer:

'आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला?' असा प्रश्न गाण्यातल्या मुलांना पडला असला तरी मला मात्र आई इतकेच बाबाही आवडतात. दोघांचेही माझ्यावर खूप प्रेम आहे.

माझे बाबा दिसायला किंचित उग्र व कडक शिस्तीचे वाटतात. पण ते मनाने फारच प्रेमळ आहेत. आम्हा मुलांवर तर त्यांचा फार जीव. माझ्या अभ्यासातील प्रगतीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. माझे सामान्यज्ञान वाढावे म्हणून ते निरनिराळी सचित्र पुस्तके आणून माझ्याकडून वाचून घेतात. ते नवीन माहितीही छान समजावून सांगतात.

अभ्यासाबरोबरच मी भरपूर खेळावे असे त्यांना वाटते. म्हणून ते मला स्वतः मैदानावर घेऊन जातात. तेथे इतर मुलांबरोबर पकडापकडी, चोर-पोलीस, बॅट-बॉल वगैरे खेळताना मला खूप मजा वाटते.

सुट्टीच्या दिवशी दुपारी कॅरम, पत्त्यांचे डाव वगैरे खेळ बाबा माझ्याबरोबर खेळतात. कधी कधी आई व ताईही या खेळात सामील होतात. मग आम्हा चौघांचा खेळ खूपच रंगतो. माझे बाबा सध्या मला सायकल चालवायला शिकवीत आहेत.

माझे बाबा खूप सपजूतदार असून अकारण रागावलेले किंवा चिडलेले मी तरी त्यांना पाहिले नाही. त्यामुळे आमचे घर नेहमी आनंदी व उत्साही असते. माझ्या बाबांसारखे बाबा सर्वांनाच मिळावेत असे मला नेहमी वाटते.

माझे बाबा निबंध मराठी - 

Similar questions