English, asked by sapnavjain9172, 1 year ago

My Favourite Teacher Essay in Marathi | My Best Teacher

Answers

Answered by halamadrid
12

Answer:

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचा खूप महत्व असतो.शिक्षक आपल्याला योग्य शिकवण देऊन जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी तयार करतात.ते आपल्याला अभ्यास तर शिकवतातच, पण त्याचबरोबर असे काही मौल्यवान मूल्ये शिकवतात,ज्यांचा आपल्याला पुढे जाऊन आयुष्यात उपयोग होतो.

प्रत्येकाचे कोणी ना कोणी आवडते शिक्षक असते.तसेच माझी आवडती शिक्षिका आहे हर्षदा अय्यर.शाळेत ती माझी इंग्रजी शिक्षिका होती. दहावी इयत्तेत ती माझी वर्ग शिक्षिकाही होती.

दैनंदिन जीवनातील उदाहरण देऊन ती प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगायची.तिची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती.ती अशा प्रकारे शिकवायची,की जणू पाठाचा संपूर्ण चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभा राहायचा.

ती अतिशय विनम्र,साधी आणि हुशार होती.ती प्रत्येकाच्या शंकांचे उत्तर द्यायची. अभ्यासात हुशार असल्यामुळे, मी तिची लाडकी होती.कधीकधी मी तिला माझ्या वैयक्तिक समस्याही सांगायची.ती मला सामधानकारक उत्तरं द्यायची. तिने मला स्वतंत्र,आत्मविश्वासी आणि उदार व्हायला शिकवले. मी तिच्याकडून बरेच काही शिकले आणि म्हणूनच ती माझी आवडती शिक्षिका आहे.

Explanation:

Similar questions