English, asked by Abhisrivastava8376, 1 year ago

My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend

Answers

Answered by Hansika4871
71

"a friend in need is a friend indeed" ही इंग्रजीतील म्हण तुम्ही ऐकली असेलच. ह्याचा अर्थ असा आहे की एका मित्राला संकटाच्या वेळी मित्राचीच मदत लागते, व दुसरा मित्र मदतीसाठी धावून येतो. असाच आहे माझा देखील मित्र.

माझ्या मित्राचे नाव "सोहम" आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी, शेवटच्या बाकड्यावर आमची पहिली भेट झाली. आधी एकमेकांशी बोलायला आम्ही थोडे लाजत होतो, पण एकदा जेव्हा बोलायला लागलो त्या नंतर आम्ही कधीच एकत्र शांत नाही बसलो. आणि सोहम माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहत असल्यामुळे आम्ही रोज भेटायचो, गम्मत करायचो, खेळ खेळायचो, एकत्र अभ्यास देखील करायचो. महिन्यातील १५ दिवस मी त्याच्या घरीच असतो, त्याचे घर देखील माझ्या घराप्रमाणे झाले आहे. काकी मला त्यांच्या दुसऱ्या मुलासारखे वागवतात.

मित्र मैत्रीण म्हटलं की रुसवे फुगवे येणारच. ती मैत्री सुद्धा काय ज्यात भांडणं नाही होत ? आमच्या मध्ये देखील कधीतरी भांडणं होतात पण नीट विचार करून आम्ही आमचे भांडण सोडवतो. आमचे दोघांचे स्वभाव खूप जुळतात म्हणून आम्ही अजूनही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. सोहम हा खूपच चांगला मुलगा व अप्रतिम मित्र आहे. कठीण प्रसंगी आम्ही एक दुसऱ्यांना सांभाळतो व काळजी घेतो. असा मित्र सगळ्यांना भेटावा हीच माझी इच्छा.

Answered by halamadrid
38

Answer:

माझ्या मैत्रिणीचे नाव महिमा आहे.ती माझी सगळ्यात खास मैत्रीण आहे.ती माझ्या घराजवळच राहते.लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलो आहोत.

आम्ही एकाच शाळेत होतो आणि आता एकाच कॉलेजमध्ये शिकत आहोत. आम्ही रोज एकत्र कॉलेजला जातो.तिथे खूप मजा करतो.मनातल्या सगळ्या गोष्टी एकमेकींना सांगतो.अभ्यासात एकमेकींना मदत करतो.ती मला नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असते. एखाद्या चांगल्या मैत्रिणीसारखी अडचणींमध्ये माझी मदत करते.ती मला वाईट संगतीपासून आणि सवयींपासून दूर ठेवते.

आम्ही सुट्टीच्या दिवशी एकत्र फिरायला जातो. एकमेकींच्या घरी जेवायला जातो.कधी कधी आमच्यामध्ये भांडण होते.पण आम्ही थोड्या वेळातच एकमेकींशी बोलायला लागतो.आमच्या मधील नातं पाहून आम्हाला सगळेजण बहिणी-बहिणी म्हणतात.

Explanation:

Similar questions