My first drawing drawn by me essay in Marathi
Answers
Answer:
I can't understand sis
■■ मी काढलेले पहिले चित्र■■
मला चित्रकलेची खूप आवड आहे. चित्रकला माझा आवडता छंद आहे. माझ्या आईने लहानपणी मला चित्रकला शिकण्याचे क्लास लावले होते, तेव्हापासून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली.
काही दिवस आगोदर मी माझ्या चित्रकलेच्या सामानाची साफ सफाई करत होती. तेव्हा, मला एक खूप जुने चित्र सापडले. त्या चित्राचे कागद थोडे फाटलेले होते, त्यावर थोडी धूळ जमली होती.
मी आईला त्या चित्राबद्दल विचारल्यावर आईने मला सांगितले की, हे चित्र मी बनवलेले सगळ्यात पहिले चित्र आहे. हे ऐकूण मी खूप खूप खुश झाले.
ते चित्र मी अगदी निरखून पाहायला लागली. त्या चित्रात एक घर होते.त्या घराला मी लाल आणि पिवळ्या रंगांनी रंगवले होते. त्या घराच्या बाजूला मी एक झाड काढले होते. वर डोंगर आणि डोंगरामधून निघणारा सूर्य होता.
ते वाकडे तिकडे काढलेले घर, विचित्र आकाराचे डोंगर, चित्रामधून बाहेर निघणारे रंग पाहून मला खूप हसू आले.त्या चित्रात आणि वर्तमानकाळात मी काढलेल्या चित्रामध्ये कीती जास्त फरक आहे, हे मला जाणावले.
मी त्या चित्राचे फोटो मोबाइलमध्ये काढले आणि माझ्या मैत्रिणीला पाठवले. मी आईला धन्यवाद केले की तिने माझे इतके जुने चित्र सांभाळून ठेवले आहे.
अशा प्रकारे, मी काढलेले पहिले चित्र पाहून मी खूप खुश झाले.