Hindi, asked by khalidshaikh4uf, 6 hours ago

my house in Marathi essay​

Answers

Answered by kp222784
1

please mark me as brainlist answer

Explanation:

!!!माझे घर मराठी निबंध!!!

घर ते स्थान असते जेथे व्यक्तीला जगातील सर्वाधिक सुख आणि शांती लाभते. घर फक्त राहण्यासाठी किंवा ऊन, वारा आणि पाऊसापासून शरीराचे संरक्षण म्हणून नसून ते आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. एका आदर्श नागरिकाची जडणघडण आदर्श घरातूनच होते.

घर छोटे असो वा मोठे प्रत्येक व्यक्तीला आपले घर प्रिय असते. जर आपले घर लहान असले तरी खरे सुख घरातच मिळते. कुटुंबातील सदस्य घरात आपलेपणा वाढवतात. घरातील कर्ताधर्ता पुरुष जेव्हा दिवसभराचे कामकाज आटपून थकलेल्या अवस्थेत घरी पोहोचतो तेव्हा त्याला जे सुख घरात मिळते ते इतर कुठेही मिळू शकत नाही.आमचे देखील एक लहानशे घर आहे. हे घर जळगाव शहरात आहे. मला माझे हे घर खूप आवडते. घर कोणतेही असो ते चुना, सिमेंट आणि विटापासून बनलेले असते. परंतु जोपर्यंत त्या घरात एक दुसऱ्याशी प्रेम करणारे लोक राहत नाही तोपर्यंत घराला घरपण येत नाही. परंतु या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे. कारण माझ्या कुटुंबातील सर्वचजण एका दुसऱ्याशी प्रेम आणि स्नेहाने राहतात. आमच्या घरात माझे आई वडील, आजी, मोठा भाऊ आणि मोठी दीदी आनंदाने राहतात.

माझे हे घर माझ्या आजोबांच्या वडिलांनी म्हणजेच माझ्या पणजोबांनी बनवले होते. घर जुने असूनही बांधकाम खूप मजबूत दगडांपासून करण्यात आले आहे. आमच्या घरात एकूण 5 खोल्या आहेत. मुख्य द्वारातून घरात प्रवेश करता बरोबर सुंदर असा हॉल आहे. या हॉल मध्ये येणाऱ्या पाहुण्यांना बसण्यासाठीची व्यवस्था केलेली असते. यानंतर किचन रूम आहे. या किचनमध्ये माझी आई आम्हा सर्वांसाठी दररोज स्वादिष्ट व्यंजन बनवते. यानंतर मागच्या बाजूला दोन बेडरूम व एक स्टोअर रूम आहे. बेडरूम मध्ये पलंग व आमच्या झोपण्याची व्यवस्था आहे. आणि स्टोअर रूम मध्ये घरातील जुन्या वस्तू तसेच काही धान्य वैगरे ठेवलेले असतेआमच्या घरात एक सुंदर देवाचे मंदिर बनवले आहे. या मंदिरात दररोज सकाळी आजींची पूजा सुरू असते. माझ्या आजी सकाळी 4 वाजेच्या उठून आंघोळ करून देवाची पूजा करतात. आजींच्या पूजेमुळे आमचे घर सकाळ सकाळी एखाद्या देऊळा प्रमाणे भासते. आमच्या घराबाहेर एक लहानशी बाग आहे. या बागेत अती सुंदर आणि सुगंधी फुले तसेच काही भाज्या लावण्यात आल्या आहेत. बागेतील या सर्व झाडांची काळजी माझी आई घेते. सकाळी उठून दरवाजा उघडता बरोबर बाहेरच्या बागेतून फुलांचा सुंदर असा मनमोहक सुगंध संपूर्ण घरात दरवळायला लागतो.आमच्या घराला एकही मजला नाही. याशिवाय आमच्या घराची छत पाहिली तर घराच्या या गच्चीवर दोन पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. या टाक्यांचे पाणी अंघोळ, शौचालय, कपडे आणि भांडी धुणे इत्यादी घरगुती कामांसाठी वापरले जाते. आमच्या घराच्या आजूबाजूला इतर लोकांची घरे आहेत. हे सर्व आमचे शेजारी आहेत. आमच्या सर्व शेजार्‍यांचा स्वभाव अतिशय चांगला आहे. दिवाळी, होळी इत्यादी सणांच्या वेळी आम्ही शेजारी तसेच कुटुंबातील सर्वचजण सोबत येऊन आनंद साजरा करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी मी माझ्या शेजारी मित्रांसोबत गच्चीवर पतंग उडवण्याचा आनंद मिळवतो. घर म्हणजे निवारा, घर म्हणजे हक्काची जागा, घर म्हणजे आपल्या माणसांच्या प्रेमाने ओथंबणारी वास्तु ! या घराला घरपण तेव्हाच येते जेव्हा यात राहणाऱ्या सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा व आपुलकीची भावना असते. जर घरातील सदस्यांमध्ये आपापसात प्रेम नसेल तर ते घर नसून नुसत्या भिंती आहेत असे या कवितेतून सांगण्यात आले आहे. प्रेम नसणारे घर हे तुरुंगाप्रमाणे असते. ज्या पद्धतीने तुरुंगाला चार भिंती असतात त्याच पद्धतीने एकमेकांविषयी आपुलकी नसणारे घर हे बंदिस्त तुरुंग असते.

Thanks

Similar questions