निबंध लिहा मी अनुभवलेला पाऊस
Answers
-----------------------------------------------------------------------------------
काल संध्याकाळी गच्च ढग दाटून आले होते. दिवसभर ते मळभ मनावर दाटलेलं. घरात एरवी कोणी नसताना मला सहसा कंटाळा येत नाही, पण काल खरच खूप उदास वाटत होतं.
आणि थोड्याच वेळात तो आला... सगळ्यांचा जिवलग पाउस... तो आला ते "मी आलोय, मी आलोय" अशी गर्जना करतच. शेवटी बराच वेळ नुसतच हातात धरलेलं पुस्तक खाली ठेवलं आणि बाहेर गेले. पाऊस मनमुराद पडत होता.... त्याच्या सरी अंगणातल्या झाडांना शाही स्नान घालत होत्या. अर्थात झाडांना खूप आनंद होत असणार.. कारण रोजरोज अशी संधी त्यांना कुठे मिळते म्हणा???
काल खूप दिवसांनी असा मस्त पाऊस पडताना इतकं निवांत पहाता येत होतं मला... काही शाळकरी मुली छान भिजत चालल्या होत्या. आपणही असच भिजायचो हे आठवून हसू आलं... त्या त्या वयाची ती ती मज्जा असते म्हणा..तेंव्हा आईने हजारवेळा सांगूनही मुद्दाम रेनकोट विसरून शाळेला जायचो आपण... आणि मग संध्याकाळी भिजून आल्यावर आई रागवायची... पण नंतर छान गरमागरम चहाही करून द्यायची, आलं टाकून.. त्या चहानं पावसाचा गारवा कुठल्याकुठे पळून जायचा..
आत्ताही मी बाहेर उभी पाहून आईची हाक... "अगं, काय करतीयेस बाहेर??? केव्हढा पाऊस पडतोय!!"
आणि इतक्यात एक चिमुकला पक्षी समोरच्या सीताफळाच्या झाडावर येउन बसला. बिचारा भिजून अंग चोरून बसला होता. नीट लक्ष देऊन पाहिलं तर त्याच्या तोंडात काहितरी होतं, ते त्यानं गट्टम केलं, त्यामुळे त्याला थोडी हुशारी वाटली असावी. मग मस्त शीळ घालत स्वारी उडून गेली.
काल खूप दिवसांनी नारळाच्या पानांवरून पाण्याचे चिमुकले थेंब पडताना पाहिले.. किती लयीत पडत होते ते... झाडाच्या पानावर ऐटीत बसलेले पाण्याचे थेंब... जणू काही मोतीच... कदाचित म्हणूनच मोत्यांना 'पाणिदार' म्हणत असतील....
एकदम आठवण आली माझ्या बांबू ट्री ची..... ते बिचारं नेहमी आपलं त्याच्या काचेच्या भांड्यात बसलेलं असायचं.... हसायचं नाही.. म्हटलं त्यालाही काळायला हवं ना??? खरा पाऊस कसा असतो ते??? मग त्याला जरा अंगणात आणून ठेवलं... बहुतेक त्याला ते आवडलेलं असावं... खुश झालं(असं मला वाटलं..)
पण कालच्या पावसानं मला खूप आनंद दिला, एव्हढं मात्र खरं...."देणारयाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी "...... खरं आहे... एकदम पटलं.....
काल खूप दिवसांनी पाऊस अनुभवला... त्याचीच ही गोष्ट... गोष्ट नाही म्हणता येणार... पण मला जे काही वाटलं ते असच लिहित आहे...