Hindi, asked by kaneezfatima71, 3 months ago

निबंध on पावसाळा in marathi​

Answers

Answered by Anonymous
12

Answer:

पाऊसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी अपुरेच पडेल. निसर्ग आपल्या पूर्ण सौंदर्यात फक्त पाऊसातच असेल असे कधी कधी वाटते. कवीकल्पना तर अनेक प्रकारे पाऊसाला स्वतःमध्ये साठवत असते. पाऊसाचे पाणी, त्याचा रिमझिम आवाज, मातीचा दरवळत राहणारा सुगंध, संपूर्ण वनराई आणि शेती हिरवाईने सुशोभित होत असते.  

पाऊस सुरू होण्याअगोदर अती रहस्यमय अशी चाहूल सुरू होते. पक्षी, प्राणी, झाडे सर्वजण सजग होतात. मेघांची गर्जना ही जणू शंखनाद असतो. मग हळूहळू पाऊसाचे थेंब जमिनीवर वर्षाव करीत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत असतो. शाळा सुरू होणे आणि पाऊसाचे आगमन हे एका वेळीच होते. शाळेचा नवीन वर्ग आणि पाऊसाची रिमझिम एका वेळीच चालू असते. त्यामुळे पावसाचा संबंध हा माझ्यासाठी सृजनात्मक असाच आहे.  

आत्ता २१व्या शतकात अनेक बदल पहावयास मिळत आहेत. त्यामध्ये मुख्यतः राहणीमानात होत चाललेला बदल आहे. त्यामुळे भारत हा शेतीप्रधान देश असून देखील पावसाची तेवढी उत्सुकता आत्ता पहावयास मिळत नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र आजही पावसाळा सुरू होताच एका नवीन जीवनाची सुरुवात झाल्याप्रमाणे वाटत राहते.  

निसर्गचक्र एका विशिष्ट पद्धतीत चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू सर्व स्थिती सांभाळून असतात तर पावसाळा ऋतू पृथ्वीला पाण्याचे दान देऊन जात असतो. पाण्याचे उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन हवामानाच्या बदलामुळे ढग निर्माण करतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाणी स्वरूपात पुन्हा एकदा जमिनीवर येतात. हे सर्व एका चक्राकार गतीने चालले असल्याने त्यास जलचक्र असेही संबोधतात.  

पाऊस हा ऋतू मुख्यतः आवडण्याचे कारण म्हणजे सृष्टीत सर्व काही सृजन स्वरूपात कार्यरत असते. हवा, पाणी, आणि झाडे हे तर आपले जीवन पुन्हा एकदा सुरू करत असतात. स्वतःमध्ये नवीन ऊर्जा भरत असतात. थंड शीतलता आणि आल्हाददायक निसर्ग देखावा यामुळे मला पावसाळा खूप आवडतो. प्रत्येक वर्षी पहिल्या पाऊसात भिजणे हे तर माझे कर्तव्यच बनून गेले आहे.

कोकिळा, पोपट, आणि मोर हे पक्षी तर पावसाळ्यात कलकल माजवतात. मोराचे पावसाळ्यात नाचणे हे तर आकर्षक सौंदर्याचा एक नमुना असतो. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात होत असतात. शेतकरी खायला लागणारे अन्नधान्य या पावसाळा ऋतुत उत्पादित करत असतो. त्यामुळे वर्षभर पाळीव जनावरे आणि मनुष्य यांच्या खाण्यापिण्याची सोय पावसाळ्यात पूर्ण होत असते.  

आज पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधनांचा वारेमाप वापर हा निसर्गावर अवकृपा करत चालला आहे. वृक्षतोडसुद्धा त्यासाठी कारणीभूत आहे. झाडे आणि जंगले कमी झाल्याने अवकाळी आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यातच पावसाळा हा शहरात फक्त पाणी साचवून ठेवतो त्यामुळे शहरी लोक फक्त पावसाचा तिटकारा करतात.  

आपण आपल्या जाणिवा आणि निसर्गाप्रती संवेदना वाढवल्या पाहिजेत. पाऊस आपल्याला जीवनदायी आहे. खाणे आणि पिणे या प्राथमिक गरजा काहीही न मागता निसर्ग स्वतःहून पूर्ण करीत असतो. त्यामुळे पाऊसाचे खूप उपकार मानवावर आहेत असे म्हणता येईल. अशा प्रकारे पावसाळा हा नवीन आल्हाददायक उर्जाशक्तीचा ऋतू माझा आवडता ऋतू आहे.

Explanation:

Answered by roopa2000
0

Answer:

झाडांमध्ये झाडे ओळखत नाहीत कारण कडक सूर्यप्रकाशामुळे झाडे आणि झाडे सुकतात पण पाऊस येताच फुलतात. नद्या आणि तलाव भरल्यामुळे पावसाळ्यात पक्षी ओळखता येतात. त्यामुळे सर्वांना पाणीपुरवठा होतो. या ऋतूमध्ये प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो आणि पृथ्वी नवीन नवरीसारखी दिसते.

पावसाळ्यातील काही ओळी:

1.आपल्या देशात प्रामुख्याने तीन ऋतू आहेत.

2. ज्यात पावसाळा खूप आल्हाददायक असतो.

3. याला पावसाळा असेही म्हणतात.

4. या ऋतूत असह्य उष्णता कमी होऊन वातावरणाला थंडावा मिळतो.

5. हा हंगाम जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो.

6. पावसाळ्यात झाडे-झाडे हिरवीगार होऊन हिरवाईने आच्छादित होते.

7. या ऋतूत कोरडे पडलेले तलाव, नद्या, डबके इत्यादी सर्व पाण्याने भरलेले असतात.

8. पावसाच्या ढगांची गर्जना पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

9. पावसाळ्यात कधी कधी इंद्रधनुष्य आकाशात दिसते.

10. अतिवृष्टीमुळे पूर येतो आणि सर्व काही उद्ध्वस्त होते.

निबंध on पावसाळा in marathi​:

पाऊस सुरू होण्यापूर्वी गूढ रेटारेटी सुरू होते. पक्षी, प्राणी, वनस्पती सर्व सजग होतात. ढगांची गर्जना शंखासारखी असते. मग हळूहळू जमिनीवर पडणारे पावसाचे थेंब त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. पावसाळा जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. शाळा सुरू होणे आणि पावसाचे आगमन एकाच वेळी झाले. शाळेचा नवा वर्ग आणि पावसाची रिमझिम एकाच वेळी सुरू आहे. त्यामुळे पावसाचे नाते माझ्यासाठी तितकेच सर्जनशील आहे.

एकविसाव्या शतकात अनेक बदल होताना दिसत आहेत. हे प्रामुख्याने राहणीमानातील बदल आहे. त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असेल, पण आपल्याला आता पावसात फारसा रस नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र पावसाळा सुरू झाला की नव्या जीवनाची सुरुवात झाल्यासारखी वाटते.

निसर्गाचे चक्र एका विशिष्ट पद्धतीने चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा सर्व परिस्थितीची काळजी घेतात तर पावसाळा पृथ्वीला पाणी दान करतो. हवामानातील बदलामुळे उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाणी म्हणून जमिनीवर परत येतात. याला जलचक्र असेही म्हणतात कारण ते सर्व गोलाकार गतीने फिरते.

मला पावसाळा आवडते याचे मुख्य कारण म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्ट सृष्टीप्रमाणे काम करते. वारा, पाणी आणि झाडे आपले जीवन पुन्हा सुरू करत आहेत. त्यांच्यात नवी ऊर्जा संचारते. मला पाऊस आवडतो तो थंडगार गारवा आणि सुंदर निसर्ग. दरवर्षी पहिल्या पावसात भिजणे हे माझे कर्तव्यच झाले आहे.

कोकिळे, पोपट, मोर पावसात फडफडतात. पावसात नाचणारा मोर हे मनमोहक सौंदर्याचे उदाहरण आहे. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात केली जातात. शेतकरी पावसाळ्यात अन्नधान्य उत्पादन करतो. त्यामुळे पाळीव प्राणी आणि मानव यांची वर्षभर देखभाल केवळ पावसाळ्यातच पूर्ण होते.

आज पाऊस अनियंत्रितपणे पडत आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधनांचा अंदाधुंद वापर यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. जंगलतोड हा देखील एक घटक आहे. जंगलतोड आणि जंगलतोड यामुळे दुष्काळ आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच पावसामुळे शहरातील पाण्याची बचत होते, त्यामुळे शहरी लोक केवळ पावसाचा तिरस्कार करतात.

निसर्गाप्रती आपली जागरूकता आणि संवेदनशीलता वाढवायला हवी. पाऊस हे जीवनरक्त आहे. निसर्ग काहीही न मागता त्याच्या खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो. म्हणून असे म्हणता येईल की मानव पावसाबद्दल खूप कृतज्ञ आहे. अशा प्रकारे पावसाळा हा नवीन सुगंधी उर्जेचा माझा आवडता ऋतू आहे.

Similar questions