India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

नागपंचमी या सणांवर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
3

श्रावण महिना हा सणांची रेलचेल घेऊन येणारा महिना होय.  श्रावण महिन्यात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीची पौराणिक एक कथा आहे,श्रीकृष्ण भगवान यांनी यमुना नदीच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन याच दिवशी केले होते  व यमुना नदीतून स्वतः भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले होते हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपंचमी म्हणजेच नागपूजा करण्यात येते. या दिवशी घरातील सर्वजण नागदेवतेची पूजा अर्चा करतात. नारळ, दूध, लाह्या, शिरा पुरीचा नैवेद्य अर्पण करतात. नागदेवाच्या  मंदिरामध्येही जागोजागी पूजेसाठी गर्दी असते. या दिवसाला शेतकरी शेत नांगरत नाही, चुलीवर तवा ठेवल्या जात नाही, पावशीने काही कापल्या जात नाही. नागपंचमीचे एक वेगळेच महत्त्व आपल्या भारतामध्ये आहे.

Similar questions