India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

शेतकारी या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
2

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे, कारण भारतातील जास्तीत जास्त लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे आणि शेतकरी बांधव  शेतीचे एक प्रमुख आहेत. शेती हा व्यवसाय प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी बांधव पावसाची वाट बघत असतात. उन असो पाऊस, सोमवार असो वा रविवार नियमितपणे सकाळपासून ते रात्रीपर्यंत राबराब राबून सर्वांसाठी शेतात कष्ट करतात. शेतकरी सकाळी उठून शेतात जातात पेरणी करणे, नांगरणी करणे, पिकांची काळजी घेणे, फवारणी करणे, वन्यप्राण्यांपासून शेताचे रक्षण करणे, पिकलेले धान्य बाजारपेठे पर्यंत पोहचवने हे सर्वकाही शेतकरी बांधाव न थकता प्रामाणिकपणे व मेहनतीने वर्षभर करीत असतो. " काळ्या मातीत मातीत तिफण चालते...... "  म्हणूनच या माझ्या भारत देशात शेतकरी हा सर्वात महत्त्वाचा सदस्य आहे. भारतीय शेतकरी हा खूप  मेहनती व प्रामाणिक आहे. अश्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना कोटी कोटी प्रणाम.

Similar questions