India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

दुरध्वनी या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
0

दुरध्वनी या यंत्राचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी इ. स. १८७६  मध्ये लावला.  घरामध्ये ट्रिंग ट्रिंग बेल वाजली की किती आनंद होतो ना..... हा आनंद दूरध्वनीमुळेच, कारण दूरध्वनीमुळे लोक जोडल्या गेली. दूरदेशी राहणाऱ्या मामांशी बोलणे किंवा बाजूच्या गावात राहणाऱ्या आजीशी गप्पा मारणे हे सर्व काही शक्य झाले ते फक्त आणि फक्त दूरध्वनीमुळे. दुरध्वनी म्हणजे अशी यंत्रे जिच्याद्वारे एखाद्या व्यक्तीस संप्रेषित केले जाऊ शकते. एका जागेवरून दुसर्‍या जागेवर बोलून काही संदेश पाठवायचा असेल तर अत्यंत सोपी व वेळ कमी लागणारी सुविधा म्हणजेच दूरध्वनी यंत्रणा. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल, लग्नाचे आमंत्रण द्यावयाचे असेल किंवा कुठला महत्त्वाचा निरोप द्यायचा असेल तर दुरध्वनी यंत्र खूपच कामाचा. यामुळे वेळ, पैसा व श्रम वाचते.

Similar questions