India Languages, asked by rosy75, 1 year ago

नाही - शब्दाची जात ओळखा

Answers

Answered by Avijoge
7

नाही हे verb ahe. I.e, kriyapad ahe.

Answered by fistshelter
4

Answer:'नाही' हे अनियमित/गौण क्रियापद आहे.

क्रियापद:

वाक्यामधील क्रिया दर्शविणार्‍या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ- मी आंबा खाल्ला.

या वाक्यात 'खाल्ला' या शब्दामुळे आंबा खाण्याची क्रिया दर्शवली गेली आहे आणि वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण झाला आहे. त्यामुळे 'खाल्ला' हे वरील वाक्यातील क्रियापद आहे.

अनियमित/गौण क्रियापद:

मराठीत काही धातू असे आहेत त्यांना काळांचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोडया वेगळ्याच प्रकारे चालतात, त्यांना ‘अनियमित/गौण क्रियापद’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ- आई घरी नाही.

यामध्ये 'नाही' या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आहे. परंतु यात कर्माचा विशेष उल्लेख नाही. म्हणून 'नाही' हे अनियमित/गौण क्रियापद आहे.

Explanation:

Similar questions