India Languages, asked by jasonseq2252, 19 days ago

नुकताच पार पडलेल्या२०२१ च्या टोकियोच्या ऑलम्पिक स्पर्धेत ज्यांनी भारतासाठी पदक जिंकले त्यांच्या बद्दलची माहिती

Answers

Answered by akshadangre2844
0

Answer:

Tokyo Olympics 2020 : नवी दिल्ली : भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 पदके जिंकली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारतीय खेळाडू अर्धा डझन पदके घेऊन मायदेशी परतणार आहेत.शेवटच्या दिवशी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यामुळे भारत क्रमवारीत 31व्या स्थानावर विराजमान झाला.

टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारताला पहिले पदक मिळाले होते. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. मीराबाईने एकूण 202 किलो वजन उचललं. या प्रकारात चीनच्या होउ झिहुईने सुवर्णपदक, तर इंडोनेशियाच्या विंडी असाहने कांस्य पदक जिंकले.

Explanation:

2) पी.व्ही. सिंधू - महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक

Answered by aivalehanmant
0

टोकियो ऑलम्पिक 2021 = भालाफेकपटू नीरज चोप्राने 87.58 मीटर भाला फेकत सुवर्णपदक निश्चित केले . यासह भारताला 13 वर्षांनी ओलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले .यापूर्वी नेमबाजपटू अभिनव बिंद्राने 2008 च्या ऑलम्पिक मध्ये भारताला पजिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. टोकियो ओलम्पिकमध्ये सुवर्ण जिंकन्याची भारतीयांची इच्छा नीरजने पूर्ण केली व भारतीय ऑलम्पिक इतिहासात वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला.

Similar questions