India Languages, asked by sskatsvs6312, 1 year ago

नामाचे प्रकार लिहून ते सोदाहरण स्पष्ट करा

Answers

Answered by halamadrid
9

■■नाम व त्याचे प्रकार■■

◆वस्तूंच्या,माणसांच्या किंवा ठिकाणांच्या नावाला 'नाम' असे म्हणतात.

●उदाहरण : सोहम, पुस्तक, मुंबई ही सगळी शब्दं नाम आहेत.

◆ नामाचे प्रकार:

१. सामान्य नाम - एकाच जातीच्या वस्तू, व्यक्तिंच्या सारखेपणामुळे त्यांना दिले गेलेले नाव म्हणजेच सामान्य नाम.

● विजय हुशार मुलगा आहे, या वाक्यामध्ये मुलगा हा शब्द सामान्य नाम आहे.

२.विशेष नाम: ज्या नामावरून संपूर्ण समूहाबद्दल ज्ञान मिळत नसून, फक्त एका विशिष्ट व्यक्ति, वस्तू किंवा प्राण्याबद्दल ज्ञान मिळते, अशा नामाला विशेष नाम म्हटले जाते.

●प्रीती खूप सुंदर मुलगी आहे, या वाक्यामध्ये प्रीती हा शब्द विशेष नाम आहे.

३.भाववाचक नाम: ज्या नामावरून वस्तू किंवा व्यक्तिमधील गुणांचा किंवा भावनांचा बोध होतो, अशा नामाला भाववाचक नाम म्हटले जाते.

● मुंबई सुंदर शहर आहे, या वाक्यामध्ये सुंदर हा शब्द भाववाचक नाम आहे.

Similar questions