२) नैसार्गिक विविधतेमुळे कोणकोणते फायदे झाले आहेत ?
Answers
Answer:
जैवविविधता इकोसिस्टमची उत्पादकता वाढवते जिथे प्रत्येक प्रजाती , कितीही लहान असो, सर्वांची भूमिका महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, मोठ्या संख्येने वनस्पती प्रजाती म्हणजे पिकांची मोठी विविधता. अधिक प्रजाती विविधता सर्व जीवसृष्टीसाठी नैसर्गिक टिकाव सुनिश्चित करते.
Answer:
निसर्गही ही माणसाला मिळालेली देणगी आहे. या सुंदर निसर्गामुळे आपण आयुष्य जगत आहोत. निसर्गातील गोष्टींची आपल्याला खूप मदत होत असते.
हवा, अन्न, पाणी, निवारा या सगळ्या मूलभूत गरजा निसर्ग पूर्ण करत असतो. म्हणून आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे.
नैसर्गिक विविधता मध्ये माणसाला एकाच वेळेस वेगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो. भारतामध्ये वेगवेगळ्या भागात निसर्गाचे वेगवेगळे रूप अनुभवायला मिळतात. कधी पर्वताच्या रांगा असतात तर कधी दऱ्याखोऱ्या असतात, कधी सपाट पृष्ठभाग असतो तर कधी नदी-नाले असतात.
नैसर्गिक वैविध्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे व फुले माणसाला मिळतात. वातावरणाला अनुकूल असलेल्या वेगवेगळ्या प्राणी पक्षी माणसाला बघायला मिळतात.
नैसर्गिक विविधतेमुळे शेतीतील माती चे प्रकार देखील वेगवेगळे असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या मातीत उगवता येणारे वेगवेगळे पीक माणसाला घेता येते. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या खनिज संपत्ती माणसाला मिळते आणि त्यामुळे देशाच्या प्रगतीस हातभार लागतो.