निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी शालेय अभ्यास नुसार पर्यावरणाचे महत्त्व थोडक्यात सांगा
Answers
पर्यावरण हा शब्द ऐकायला जरी साधा, सोप्पा वाटला तरी त्याची जधन गढण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आूबाजूला पर्यावरण पसरलेला आहे आणि त्याचे संबंध आपल्याशी खूप जुने आहे. पर्यावरणाची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे, जर तसे नाही केले तर कठीण परिस्थितीनं सामोरं जावं लागतं. उदा, अवकाळी पाऊस, उकाडा, वादळ इत्यादी.
ग्लोबल वॉर्मिग च्या काळात झाडे ही खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहेत. ठिकठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा असे आपल्या कानावर पडत असेलच. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात व कार्बन डायऑक्साइड सोशून घेतात.
झाडे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहेत . अशीच झाडांची संकल्पना देवराई ह्याला जन्म देते.
देवराई महणजे गावाबाहेर घनदाट पण विशिष्ट पद्धतीतून लावलेले झाडे. ही खूप जुनी संकल्पना आहे आणि ह्याच्या खूप जुन्या काळाशी संबंध आहे. जेव्हा आपण झाडे लावू तेव्हा आजूबाजूला हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल, ग्लोबल वॉर्मिग ची पातळी कमी होईल आणि आपल्या सगळ्यांना शुद्ध हवा मिळेल. जर सगळ्यांनी झाड लावायला घेतला (किमान एक झाड) तर आपला देश बहरून येईल आणि पर्यावरण साठी खूप पोषक ठरेल, म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा.
वरती सांगितलेल्या गोष्टी आपण केल्या तर नक्कीच त्याचा निसर्गावर चांगला परिणाम दिसेल.