Environmental Sciences, asked by anushka889859, 10 months ago

निसर्गाच्या विरोधात न जाता मर्जीत राहणे केव्हाही फायद्याचा आहे हे विधान स्पष्ट करा​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

झुक झुक, झुक झुक आगिनगाडी ! धुरांच्या रेषा हवेत काढी !पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया..!

हे गाणं लहानपणी माझ अगदी आवडीच होतं. परीक्षा जवळ आली कि अभ्यासापेक्षाही सुट्टीमध्ये काय काय धमाल करायची याचाच विचार डोक्यात चालू असायचा. त्यावेळी मामाच्या किंवा इतर नातेवाईकांच्या गावी भेटायला जाणे हाच सुट्टीतला ठरलेला कार्यक्रम असायचा. पण गेल्या १५ – २० वर्षांमध्ये हे चित्र बदललेलं दिसतंय. मामाच्या गावाच्या जागी आता एखादा समुद्र किनारा, थंड हवेच ठिकाण, पावसाळी धबधबा किंवा घनदाट जंगल आलेलं आहे. सुट्टीमध्ये भेट द्यायची ठिकाणं आता बदलली आहेत आणि त्याचबरोबर बदलतंय त्या ठिकाणच स्थानिक पर्यावरण!

पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. जगातील काही देशांची तर बहुतांशी अर्थव्यवस्थाच तेथील पर्यटनावर अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील पर्यटनही गेल्या दशकभरात २५ त ३० टक्क्यांनी वाढले आहे आणि त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पर्यटन वाढीचे मुख्य कारण आहे त्या त्या देशातील निसर्ग संपन्न प्रदेश, वैभवशाली इतिहास आणि स्थानिक संस्कृती! तस बघायला गेलं तर उंचसखल डोंगरदऱ्या, समृद्ध जंगले, शांतरम्य समुद्रकिनारे, वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता, जीवनदायिनी नद्या, फेसाळ धबधबे, वाळूची पुळण व खाड्या, कांदळवने, छोटी मोठी बेटे, गवतांचे गालिचे पसरलेली पठारे, पाण्याचे तलाव, अंधाऱ्या गुहा आणि पूर्वापार देवराया म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच!

निसर्गाची हि सर्व रूपे पर्यटकांसाठी तर आकर्षणाचा बिंदू आहेतच, पण त्याही पुढे जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक जैवविविधतेसाठी अधिवास म्हणून त्यांचे महत्त्व खूपच जास्त आहे. अनेक प्राणी, पक्षी, छोटे कीटक, सरीसृप, अन्नसाखळीतील छोटे मोठे घटक यांचे जीवन या अधिवासांवर अवलंबून आहे. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यामधे या घटकांचा वाटा फार मोठा आहे. त्यामुळेच पर्यटनाचा आनंद घेतानाच या अधिवासांची म्हणजेच तेथील पर्यावरणाची काळजी घेनही तेवढच अत्यावशक आहे. पण सद्यपरिस्थितीत चालू असलेल्या पर्यटनावर एक नजर फिरवली तर या अधिवासांची व पर्यायाने तेथील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसून येते आहे. अनियंत्रित पर्यटन व योग्य नियोजनाच्या अभावामुळे एकेकाळी सौंदर्यपूर्ण व निसर्गसंप्पंन असलेली हि पर्यटनस्थळे आता बकाल होऊ लागली आहेत. परिणामत: या ठिकाणी अस्वच्छता, वृक्षतोड, वाढती गर्दी, पर्यटनस्थळांची नासधूस, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यांत्रिकीकरण व आधुनिकीकरणाच्या वेगात हे प्रमाण जास्तच वाढले आहे. या सगळ्याला वेळीच आवर घातला नाही तर निसर्गाचा हा सगळा अनमोल ठेवाच नाहीसा होण्याची शक्यता आहे. पर्यटनाच्या प्रगतीबरोबरच स्थानिक पर्यावरणाची काळजी घेणंही तेवढच गरजेच आहे. यासाठी अनियंत्रित व बकाल पर्यटनाऐवजी सुनियोजित व शाश्वत अशी ‘निसर्ग पर्यटन’ हि संकल्पना राबविणे अत्यावशक बनले आहे.

Similar questions