India Languages, asked by tusharbbarai, 20 days ago

निसर्ग हा खरा आनंद देणारा स्तोत्र अहे​

Answers

Answered by mansi0807
0

निसर्गाबद्धल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे येतील. कुणाला निसर्ग लहरी वाटेल, कुणाला कृपाळू जीवनदाता वाटेल, तर कुणाला क्रूर वाटेल. निसर्गाला देव मानणारेही कमी नाहीत. मात्र, निसर्गाचे वागणे काही वेळा बुचकळ्यात टाकणारे असते.

निसर्गाबद्धल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे येतील. कुणाला निसर्ग लहरी वाटेल, कुणाला कृपाळू जीवनदाता वाटेल, तर कुणाला क्रूर वाटेल. निसर्गाला देव मानणारेही कमी नाहीत. मात्र, निसर्गाचे वागणे काही वेळा बुचकळ्यात टाकणारे असते.एक दाणा पेरला, तर त्यातून शेकडो दाणे निसर्ग तयार करतो. वेगवेगळ्या जाती-प्रजाती तयार करतो आणि त्या टिकून राहाव्यात, म्हणून त्यांची निर्मितीही हजारोंनी करतो. तऱ्हेतऱ्हेच्या रंगांच्या आणि गंधांच्या पानाफुलांची, परागकणांची, आकाशातल्या रंगांच्या असंख्य छटांची मुक्तहस्ताने उधळण करतो. एकीकडे अशी उधळपट्टी करणारा निसर्ग काही बाबतीत मात्र अतिशय काटकसर करताना दिसतो. उदाहरणार्थ पाणी. आपण म्हणतो, पाणी नेहमी तळ गाठत जाणार. म्हणजे सगळ्यांत कमी ऊर्जेची पातळी गाठल्यावरच वाहायचे थांबणार. तसेच पाण्याचा थेंब बघितला, तर तो गोल असतो. चेंडूसारख्या गोलाच्या आकाराचे एक वैशिष्ट्य आहे. एका विशिष्ट घनफळासाठी चेंडूसारख्या वस्तूच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमीतकमी असते. पाण्याचा थेंब गोल असल्यामुळे त्याच्या विशिष्ट घनफळासाठी असलेले त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमीतकमी असते. (फॉर अ गिव्हन सरफेस एरिया द स्फेअर इज द वन सॉलिड दॅट हॅज द ग्रेस्टेज व्हॉल्युम.) दुसरे उदाहरण प्रकाशाचे. प्रकाश हा नेहमी अशाच मार्गाने जातो, की जिथे प्रकाशाला जायला कमीतकमी वेळ लागेल. (लाइट चूजेस द पाथ ऑफ मिनिमम टाइम.)

Similar questions