Math, asked by omkarmartale, 4 months ago

निसर्ग हा मोठा जादुगर आहे हे विधान ए वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते

Answers

Answered by XxitsmrseenuxX
7

Answer:

जून -जुलैमध्ये शाळा -महाविदयालय सुरु झाली की ,नित्यनेमाने वर्षाऋतूचे आगमन होते . आषाढ महिन्यात तर सूर्याचे दर्शन दुर्लभ होतो . पाऊस असो वा नसो ,दिवसभर मळभ असते . त्या कुंद वातावरणात मन थोडेसे उदास झाले असताना समोर दिसणाऱ्या टेकडीकडे सहजच लक्ष गेले आणि आश्चर्याचा धक्का बसला . मे महिन्यात ओकीबोकी दिसणारी ,मातीने लाल दिसणारी ही टेकडी आता जणू हिरवा शालू नेसून नववधूसारखी सजून उभी होती . मे महिन्याच्या सुट्टीत कितीतरी वेळा मी  या टेकडीवर गेलो होतो .  सुसाट वाऱ्याबरोबर तेथे धावलो होतो . या रखरखीत भूमीतून हिरवे अंकुर कधी फुटतील असे वाटलेच नव्हते . कवी मंगेश पाडगावकर यांच्या 'सत्कार 'कवितेचे चरण ओठावर आले -'पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार '. ही सारी किमया कोणी केली ?तो किमयागार आहे -निसर्ग !

माणूस हा निसर्गाचे लेकरू आहे . या निसर्गाने मोठ्या मायेने माणसाला सहस्र करांनी खूप काही भरभरून दिले आहे . निसर्ग मोठा दिलदार आहे . आपल्याजवळ असलेले सर्व काही माणसांसाठी उधळून देतो . निसर्ग हा माणसाचा गुरु आहे . आपले पूर्वज सतत निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांनी आपल्या निसर्गालाच दिले आहे . संत तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली हे तर आपले 'सगेसोयरे ' वाटतात . कवयित्री इंदिरा संत यांना आपल्या  एकाकी जीवनात अगंनातील झाडांची साथसंगत सुखावते . आमच्या वाड वडिलांनी निसर्गात परमेश्वरचे रूप दिसत असे आणि म्हणून वेळप्रसंगी ते निसर्गाची मनोभावे पूजा करत .  

मला निसर्ग हा मोठा किमयागार वाटतो . या निसर्गाच्या सर्व लीला पूर्णपणे आपल्याला कळत नाहीत . सागराचे पाणी खारट ;पण भरसमुद्रात असणारया अलिबागच्या किल्ल्यातील विहिरीतील पाणी मात्र गोड !

वज्रेश्वरीला एकाला एक लागून असलेल्या चार कुंडातील पाणी गरम आहे . ही सारी निसर्गाची किमया नाही  

का ?

निसर्गाने मानवाला खानिजांबाबत एवढे समृद्ध केले आहे ;पण करंटा माणूस अनेकदा  खानिजांबाबत इतका उधळा होतो की ,त्याला त्यांचे अमुल्यत्व पटत नाही निसर्गातील साध्या दगडातही विविधता किती ?जांभा दगड ,तांबडा दगड व काळा दगड . माती घेतली तरी निसर्गाची जादू पाहा . गाळाची मृदा पर्वतीय मृदा , रेगूर मृदा ,तांबडी मृदा दलदलयुक्त मृदा … अशा मातीच्या विविध प्रकारच्या आहेत . आकाशातील तारे ,नक्षत्र ,ग्रह यांतही किती नयनरम्य विविधता . निसर्गाच्या या विविधतेचा अभ्यास करण्याचा माणूस कसून प्रयत्न करतो आणि शेवटी अयशस्वी ठरतो . आज रात्री उल्कापात होणार ,मनोरम द्रुश्य दिसणार ,असे खगोलशास्त्रयांनी जाहीर केले कोटय वधी माणसे दुर्बिणी घेऊन जागत राहिली ;पण अशी आतषबाजी झालीच नाही . शास्त्रद्यानाचे अंदाज चुकतात हा खटयाळ निसर्ग नक्कीच गालातल्या गालात हसत असणार .  

निसर्गाची  कितीतरी  कोडी अजून माणसाला उलगडली नाहीत आणि उलगडणारही नाहीत . निसर्गाच्या किमयेला सलाम करून दाद दिली पाहिजे . निसर्गाचे आपण ऋणी राहिले पाहिजे .

HOPE THIS WILL HELP YOU

PLZ.. MARK THIS ANSWER AS BRAINLIEST

Similar questions